लग्नानंतर पूजा सावंत करणार अभिनयाला रामराम?; ऑस्ट्रेलियात होणार स्थायिक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 02:44 PM2024-01-22T14:44:46+5:302024-01-22T14:50:19+5:30

Pooja sawant: पूजाचा होणारा नवरा ऑस्ट्रेलियामध्ये सध्या स्थायिक आहे. त्यामुळे लग्नानंतर पूजा काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांच लक्ष आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत सध्या (Pooja Sawant) प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी तिने साखरपुडा झाल्याची खुशखबर दिली आणि सर्वांना सुखद धक्का दिला. ती सिद्धेश चव्हाणसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.

पूजाने तिच्या लग्नाची माहिती चाहत्यांना दिल्यापासून तिच्याविषयी अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत.

पूजा लग्नानंतर करिअर सोडणार का? ती तिच्या नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियाला स्थायिक होणार का? असे प्रश्न चाहत्यांना पडत आहेत. यावर पूजाने नुकतंच उत्तर दिलं आहे.

पूजाने नुकतीच 'लोकसत्ता'च्या 'डिजिटल अड्डा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या लग्नानंतरचा प्लॅन सांगितला.

सिद्धेश कायमस्वरुपी ऑस्ट्रेलियात नाहीये. तो अलिकडेच २ वर्षांपूर्वी तिकडे शिफ्ट झालाय. तो मूळचा मुंबईचा असून त्याचे आई-बाबा मुंबईतच आहेत. त्यामुळे आम्ही सगळे मुंबईमध्येच राहणार आहोत, असं पूजा म्हणाली.

पुढे ती म्हणते, सिद्धेश अजून काही वर्ष ऑस्ट्रेलियात राहणार आहे. त्यामुळे मी सुद्धा काही वर्ष तिकडे येऊन-जाऊन करेन. हे अरेंज मॅरेज असल्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तयार आहोत.”

दरम्यान, पूजा मुंबईमध्येच लग्न करणार आहे. यापूर्वी ती डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, तिने मुंबईमध्येच लग्न करणार असल्याचं स्पष्ट केलं.