'मुझे ऐसे मत जलाओ…' म्हणत प्राजक्ता माळीनं साडीतील फोटो केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 02:21 PM2023-04-03T14:21:41+5:302023-04-03T14:24:40+5:30

Prajakta Mali : प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर साडीतले काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूप सुंदर दिसते आहे.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali)ने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

अभिनेत्रीने मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे.

प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

तसेच तिचे सोशल मीडियावरील फोटो चर्चेत येत असतात. नुकतीच इंस्टाग्रामवरील तिची पोस्ट चर्चेत आली आहे.

प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर साडीतले काही फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, मुझे ऐसे मत जलाओ…मेरी प्रीत है कुंवारी…तूम ले गये हो अपने, संग नींद भी हमारी…तुम्हें याद करते……

प्राजक्ता माळीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

सुरुवातीच्या काळात काही मालिकांत काम करून प्राजक्ता घराघरांत पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही स्वप्न तिने पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं.