आँखों ही आँखों में इशारा हो गया…! , प्राजक्ता माळीच्या लेहंग्यातील फोटोंना मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 11:58 AM2022-11-08T11:58:51+5:302022-11-08T12:05:34+5:30

Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या लेहंग्यातील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

प्राजक्ता माळी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घराघरात पोहचली.

प्राजक्ता माळी हिने मालिका, चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.

दिवसेंदिवस प्राजक्ताच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

प्राजक्ता सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना अपडेट देत असते.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावर बऱ्याचदा फोटो शेअर करत असते.

नुकतेच प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

प्राजक्ताने गुलाबी रंगाच्या लेहंग्यातील फोटो शेअर केले आहेत. प्राजक्ताने हे फोटो शेअर करत लिहिले की, आँखों ही आँखों में इशारा हो गया… बैठे बैठे जीने का सहारा हो गया…।

प्राजक्ता माळीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. या फोटोशूटवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती शेवटची लकडाउन चित्रपटात अंकुश चौधरीसोबत दिसली होती.

सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे.