खतरनाक! सेकंड हनिमूनसाठी बायकोला थायलंड घेऊन गेला प्रथमेश परब, वाघाच्या शेजारी बसून काढला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:49 IST2025-02-24T12:42:48+5:302025-02-24T12:49:29+5:30

वेडिंग अॅनिव्हर्सरीनिमित्त प्रथमेश पत्नी क्षितीजासह थायलंडला गेला आहे. थायलंडमधील फुकेत येथे ते दोघे त्यांचा क्वालिटी टाइम घालवत आहेत.

प्रथमेश परब हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. टाइमपास मुळे तो प्रसिद्धीझोतात आला.

वेडिंग अॅनिव्हर्सरीनिमित्त प्रथमेश पत्नी क्षितीजासह थायलंडला गेला आहे. थायलंडमधील फुकेत येथे ते दोघे त्यांचा क्वालिटी टाइम घालवत आहेत.

गेल्याच वर्षी प्रथमेशने लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली. आज त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे.

थायलंड ट्रिपचे फोटो प्रथमेश आणि क्षितीजाने सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

या फोटोंमधील वाघाबरोबरच्या त्यांच्या फोटोने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

प्रथमेश आणि क्षितीजाच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रथमेश आणि क्षितीजाने गेल्यावर्षी २४ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली होती. त्याआधी काही वर्ष ते एकमेकांना डेट करत होते.