दादूसच्या लाडक्या प्राजूची हळद; क्षितीजाला लागला प्रथमेशच्या प्रेमाचा रंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 11:54 AM2024-02-23T11:54:57+5:302024-02-23T11:59:32+5:30

Kshitija ghosalkar: अभिनेता प्रथमेश परब लवकरच त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा हिच्यासोबत लग्न करणार आहे. त्यामुळे सध्या या दोघांच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना आणि कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. त्यात क्षितीजाने तिच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.

मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईचे वारे वाहत आहेत. यात सध्या अभिनेता प्रथमेश परब याच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे.

येत्या २४ फेब्रुवारी तारखेला म्हणजेच उद्या प्रथमेश आणि क्षितीजा लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे या दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या विधी, कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

नुकतीच प्रथमेशच्या हळदी समारंभाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आता त्याच्या प्राजूला म्हणजेच क्षितीजालाही त्याच्या नावाची हळद लागली आहे.

क्षितीजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती त्यांच्या लग्नातील प्रत्येक समारंभ, कार्यक्रम यांचे अपडेट चाहत्यांना देत आहे.

क्षितीजाने तिच्या हळदी समारंभाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे ती कमालीची सुंदर दिसत आहे.

क्षितीजाने या हळदीसाठी खास पिवळ्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला होता. सोबतच फुलांची ज्वेलरी सुद्धा घातली होती.

“गजर झाला दारी, साजनाची स्वारी…साजनाची स्वारी आली लाज गाली आली….” असं सैराटमधलं गाणं कॅप्शनमध्ये देत क्षितीजाने हे फोटो शेअर केले आहेत.

अलिकडेच क्षितीजाने सोलो प्री वेडिंग शूट केलं होतं. तिच्या या फोटोशूटचीही नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा झाली होती.