ती परी अस्मानीची! चहाचा मळा, हलका पाऊस; नयनरम्य वातावरणात प्रिया बापटचं खास Photoshoot

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 11:25 AM2024-06-24T11:25:01+5:302024-06-24T11:32:05+5:30

हिमाचल प्रदेशातील सोलो ट्रीप, प्रिया बापट दिसतेय जणू परी!

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) सध्या सिनेमा, वेबसीरिज आणि नाटक अशा तीनही माध्यमांतून प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. तिच्या काही हिंदी वेबसीरिज तर गाजल्याच तर आता ती सध्या उमेशसोबत 'जर तरची गोष्ट' नाटकाचे प्रयोग करत आहे.

आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत प्रिया नेहमीच तिची आवड जपते. वाचनासोबतच तिला फिरण्याचीही आवड आहे हे बऱ्याचदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन लक्षात येतं.

प्रियाने नुकतीच सोलो ट्रीप केली. धर्मशाळा येथील सुंदर ठिकाणी फिरण्याचा तिने आनंद घेतला. हिमालयात ट्रेक, तसंच थंडगार पाण्यात डुंबतानाचे काही क्षण तिने शेअर केले.

प्रियाने या सोलो ट्रीपमधील खास फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत. निसर्गाचा आनंद घेताना, रम्य वातावरणात पुस्तक वाचतानाचे काही क्षण तिने सोशल मीडियावर पोस्ट केले.

आता प्रियाची एक फोटो सीरिज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. पांढऱ्या रंगाचा वनपीस, मोकळे केस अशा लूकमधील तिचे फोटो पाहून सगळेच आपसूकच WOW म्हणत आहेत.

धर्मशाळा येथील टी इस्टेट्स मध्ये तिने हे फोटोशूट केलंय. नयनरम्य वातावरण आणि त्यात प्रियाचा ग्लॅमरस लूक काळजाचा ठोका चुकवणारा आहे.

प्रिया बापट ४ दिवसांच्या या सोलो ट्रीपवर गेली होती. याचा अनुभव सुद्धा तिने सोशल मीडियावर लिहिला आहे.