उफ्फ तेरी अदा... प्रिया बापटच्या साडीतील फोटोंवर चाहते घायाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 05:50 PM2021-06-01T17:50:46+5:302021-06-01T17:59:56+5:30

अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय ती नेहमी सोशल मीडियावर फोटोही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यास प्रियाचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.

साडीमध्येही तिचे खूप सारे सुंदर फोटो लक्ष वेधून घेतात.

प्रियाने इन्स्टाग्रामवर पारंपरिक अंदाजातील साडी परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत ती खूप सुंदर दिसते आहे.

प्रिया बापटच्या या फोटोला पसंती मिळत असून त्यावर तिचे चाहते कमेंट्स करत आहेत.

तिची साडीतली प्रत्येक अदा तुम्हाला घायाळ केल्याशिवाय राहणार नाही.

साडीतल्या वेगवेगप्ळ्या अदांनी प्रियाच्या सौंदर्याला चारचाँद लावलेत.

प्रिया बापटचे सौंदर्य साडीत पहा कसं खुलून आलंय.

यांत तिने निळ्या रंगाची साडी आणि त्याला साजेसा ब्लाउज परिधान केला आहे.

हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो प्रिया बापट सोशल मीडियावर शेअर करत असते.