IN PICS : या मराठी अभिनेत्रींचे आहेत स्वत:चे मोठे ब्रँड, अभिनयासोबत कमावतात चिक्कार पैसा By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 08:00 AM 2022-06-06T08:00:00+5:30 2022-06-06T08:00:02+5:30
Marathi Actresses Who have their brands : प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होणारे अनेक कलाकार मंडळी वेगवेगळा बिझनेस करून चिक्कार पैसा कमवत आहेत. मराठी अभिनेत्रीही यात मागे नाही. अनेक मराठी अभिनेत्रीचे स्वत:चे लोकप्रिय बँड्स आहेत. प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होणारे अनेक कलाकार मंडळी वेगवेगळा बिझनेस करून चिक्कार पैसा कमवत आहेत. मराठी अभिनेत्रीही यात मागे नाही. अनेक मराठी अभिनेत्रीचे स्वत:चे लोकप्रिय बँड्स आहेत.
निवेदिता सराफ या मराठी इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेत्री. निवेदितांचा अस्सल सिल्कच्या डिझायनर साड्यांचा ब्रँड आहे.‘हंसगामिनी’ असं त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. हा साड्यांचा ब्रँड पुण्यामध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे.
अभिनेत्री प्रिया बापट ही सर्वांची लाडकी अभिनेत्री. मराठीसोबत हिंदीतही तिचा बोलबाला आहे. प्रियाचाही एक स्वत:चा ब्रँड आहे. होय, प्रिया व तिची बहिण श्वेता यांचा ‘सावेंची’ नावाचा साडीचा ब्रँड आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर ही सुद्धा मागे नाही. तिचा सुद्धा साडीचा एक लोकप्रिय बँड आहे. ‘द सारी स्टोरी’ असं तिच्या या ब्रँडचं नाव आहे.
तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे या दोघी लोकप्रिय मराठी अभिनेत्री. दोघी चांगल्या मैत्रीणीही आहेत. दोघींनी मिळून ‘तेजाज्ञा’ नावाचा ब्रँड सुरू केला आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धतीचे कुर्ते आणि कपडे, खणाच्या साड्या या बँडमध्ये उपलब्ध आहेत.
आरती वडगबाळकर ही लोकप्रिय अभिनेत्री. टाइम पास, आम्ही दोघी, डबलसीट सारख्या चित्रपटामध्ये झळकलेल्या आरतीचा ‘कलरछाप’ नावाचा ब्रँड आहे. सुटसुटीत कॉटनचे ड्रेस, साड्या ही तिच्या या ब्रँडची खासियत आहे.
‘दिल दोस्ती दुनियादारी’मधून घराघरात पोहचलेली पूजा ठोंबरे हिनेही कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे. ‘त्रिणि बाय3’ असं तिच्या ब्रँडचं नाव आहे.
गिरीजा ओक- गोडबोले हे केवळ मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन सृष्टीमधलं एक मोठ्ठ नाव. गिरीजाचा ‘फ्रेश लाईम सोडा’ नावाचा कपड्यांचा ब्रँड आहे. जेन्टस क्लोथिंग आणि कपल ट्विनिंग ही या ब्रँडची खासियत आहे.
अभिनेत्री क्रांती रेडकर मराठी कलाक्षेत्रामधील मोठं नाव आहे. तिने आपला स्वत:चा कपड्याचा बँड सुरु केला आहे. आपल्या मुलीच्या नावाने तिने ‘झिया-ज्यादा’ नावानं तिनं हा ब्रँड सुरू केला आहे.