'बिचारा माझा नवरा तिकडे आहे...', लाँग डिस्टन्स मॅरेजबद्दल रसिका सुनील म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 04:51 PM2024-07-20T16:51:18+5:302024-07-20T16:57:41+5:30

रसिकाने २०२१ साली आदित्य बिलागीसोबत लग्न केले. जो डान्सर असून टोरंटोमध्ये राहतो.

शनाया या नावाने संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) सध्या चर्चेत आहे. नुकताच तिचा 'डंका' सिनेमा रिलीज झाला. शिवाय 'डाएट लग्न' या नाटकातूनही ती प्रेक्षकांच्या समोर आली.

रसिका उत्तम अभिनेत्री आहे मात्र तरी ती फार मोजक्या भूमिकामध्ये दिसते. तसंच तिने शनाया पात्र गाजलेलं असताना अचानक मालिकेतून एक्झिट घेतली आणि ती परदेशात गेली. दोन वर्ष रसिका परदेशात होती. तिथून आल्यानंतर तिने लग्न केल्याची बातमी दिली आणि सर्वांनाच धक्का बसला.

या सर्व प्रश्नांवर रसिकाने उत्तरं दिली. 'प्लॅनेट मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत रसिकाने करिअर, लग्न, लाँग डिस्टन्स मॅरेज यावर गप्पा मारल्या.

रसिका जास्त करुन भारताबाहेरच असते असा अनेकांचा समज आहे. ती म्हणाली, "मला हे परखडपणे स्पष्ट करायचंय की ज्यांना वाटतं की मी खूप वेळ भारताबाहेर असते तर तसं नाहीए. मी भारतातच असते. मी वर्षातले दोन महिने तेही माझा नवरा तिकडे असतो म्हणून जाते. "

"बिचारा तो तिकडे आहे लाँग डिस्टन्स मॅरेज सुरु आहे त्यामुळे वर्षातले दोन महिने तरी आम्हाला एकत्र राहायचं असतं म्हणून मी तिकडे जाते. "

करिअर आणि लग्न हे दोन्ही वेगळे पारडे आहेत. त्यामुळे आता करिअर केलं तर लग्न खाली जातंय की काय आणि करिअर वर येतंय तर लग्न नको करु की काय ही तुलनाच मुळात चुकीची आहे.

तू करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असताना का लग्न केलंस? असा प्रश्न आपण कुठल्याही पुरुष कलाकाराला विचारत नाही. उलट आपण तो निर्णय साजरा करतो. मग तसंच अभिनेत्रींचा निर्णय का साजरा होत नाही.

रसिकाने 2021 साली आदित्य बिलागीसोबत लग्नगाठ बांधली. आदित्य टोरंटोमध्ये वास्तव्यास असून तो तिथे प्रसिद्ध डान्सर आहे. रसिका लवकरच 'काटाकिर्र' सिनेमात एका वेगळ्याच भेमिकेत दिसणार आहे.