खूबसूरत! 'सैराट' फेम रिंकू राजगुरुला पाहून आली 'या' अभिनेत्रीची आठवण, Photos व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 07:45 PM2024-10-06T19:45:50+5:302024-10-06T20:21:33+5:30

आर्चीचं हे फोटोशूट पाहिलं का?

महाराष्ट्राची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) तिच्या सौंदर्यामुळे चाहत्यांना भुरळ घालत आहे. 'सैराट' मधली लहान रिंकू आता तारुण्यात आहे.

रिंकू तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. तिचे पारंपरिक लूकमधील फोटो कायम व्हायरल होत असतात.

अनेकदा रिंकूच्या लूकची तुलना ही दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशीही केली जाते. बरेचदा तिच्याकडे पाहून चाहत्यांना स्मिता पाटील यांचीच आठवण आली आहे.

रिंकूने नुकतेच असेच काही फोटो पोस्ट केलेत. यातील रिंकूची नजर पाहून तिच्यात स्मिता पाटीलच दिसून येत आहेत. सावळा रंग, डोळ्यात काजळ आणि धारदार नजर यामुळे रिंकूने लक्ष वेधून घेतलंय.

नुकतीच ती सैराटच्या परश्यासोबत म्हणजेच आकाशसोबत एका इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिचा लूक चर्चेत राहिला. याच लूकमधील हे फोटो तिने पोस्ट केलेत.

काळा स्कीनटाईट टॉप आणि स्कीन कलरचा स्कर्ट यामध्ये तिने हे फोटोशूट केलंय. तिचे हे फोटो पाहून चाहतेही घायाळ झालेत. Eyes hold conversation असं कॅप्शन तिने दिलं आहे.

तुझे हे फोटो पाहून आम्ही नि:शब्द झालो आहोत अशा कमेंट्स तिच्या फोटोंवर आल्या आहेत.