IN PICS: रितेशने जिनिलियाला दिलेलं पहिलं गिफ्ट कोणतं? तिने आजही जपून ठेवलेलं... By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 08:00 AM 2022-01-06T08:00:00+5:30 2023-01-05T18:54:52+5:30
Riteish Deshmukh, Genelia Deshmukh : रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे सर्वाधिक लोकप्रिय मराठमोळं कपल. या कपलचे अनेक चाहते आहेत. रितेश भाऊ अन् जिनिलिया वहिनींची लव्हस्टोरी फारच भारी आहे. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे सर्वाधिक लोकप्रिय मराठमोळं कपल. या कपलचे अनेक चाहते आहेत. रितेश भाऊ अन् जिनिलिया वहिनींची लव्हस्टोरी फारच भारी आहे.
नुकताच दोघांचा ‘वेड’ हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाने सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. रितेश व जिनिलियाच्या तर चाहते पुन्हा एकदा प्रेमात पडले आहेत.
तर आता रितेश भाऊ अन् वहिनीसाहेबांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलुयात. तुम्हाला माहित आहेच की, ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमात रितेश व जिनिलिया पहिल्यांदा एकत्र झळकले होते.
‘तुझे मेरी कसम’ हा सिनेमा तुफान गाजला होता. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्रीही लोकांना प्रचंड आवडली होती. दोघांच्या या सिनेमाला नुकतीच 20 वर्षे पूर्ण झाली आहेत.
यानिमित्त रितेश व जिनिलिा यांनी नुकतीच मीडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत रितेशने आपल्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलंच शिवाय जिनिलियाला दिलेल्या पहिल्या गिफ्टबद्दलही सांगितलं.
तू जिनिलियाला दिलेलं पहिलं गिफ्ट कोणतं होतं? असा प्रश्न यावेळी रितेशला विचारण्यात आलं. या प्रश्नाला रितेशने दिलेल्या उत्तरानं सर्वांचं लक्ष वेधलं.
रितेशने सांगितलं की, मी जनिलियाला दिलेलं सर्वात पहिलं गिफ्ट म्हणजे गुलाबाचं फुल होतं आणि महत्वाचं म्हणजे जिनिलियाने आजही ते फुल जपून ठेवलं आहे. तिने हे फुल एका पुस्तकात ठेवलं आहे.
सध्या रितेश आणि जिनिलिया आपल्या ‘वेड’ या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. जिनिलियाने बऱ्याच कालावधीनंतर पडद्यावर कमबॅक केलं आहे.
‘वेड’ या मराठी चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकजी आहेत. साऊथच्या ‘मंजिली’ या सिनेमाचा रिमेक असला तरी या चित्रपटातील रितेश व जिनिलियाची केमिस्ट्री अफलातुन आहे.
रितेशने दिग्दर्शित केलेला ‘वेड’ हा पहिला सिनेमा आहे. त्याच्या दिग्दर्शनाचंही भरभरून कौतुक होतंय. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळे आणि उदंड प्रतिसादामुळे ‘वेड’ सिनेमा दमदार कमाई करत आहे.