'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम रोहित राऊतची 'लेडी लव्ह', मराठी सिनेइंडस्ट्रीतील गायिका असून दिसते लय भारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 15:40 IST2021-11-26T15:29:43+5:302021-11-26T15:40:25+5:30
'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम रोहित राऊत आहे या गायिकेच्या प्रेमात

‘सारेगमप लिटील चॅम्प’मधून प्रसिद्ध झालेल्या रोहितने ‘इंडियन आयडॉल’मध्येही झळकला होता.
रोहित राऊत गायिका जुईली जोगळेकरच्या प्रेमात आहे.
रोहित राऊत आणि जुईलीने अद्याप प्रेमाची कबुली दिली नसली तरीदेखील सोशल मीडियावरील त्यांचे फोटो बरेच काही सांगून जातात.
सोशल मीडियावर नजर टाकल्यावर लक्षात येते की दोघे एकत्र क्वॉलिटी टाइम स्पेंड करत असतात.
रोहित आणि जुईली मागील १० वर्षापासून रिलेशनशीपमध्ये आहे.
अप्रत्यक्षपणे दोघांनीही व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एकमेकांसह फोटो शेअर करुन त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.
जुईलीसुद्धा गायिका असून 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमातून तिच्या सुमधुर गायकीनं तिनं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. दोघांमध्येही खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळते.