Sai Tamhankar : सई ताम्हणकर सिंगल आहे की मिंगल? यावर अभिनेत्रीनं दिलं हैराण करणारं उत्तर By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 07:53 PM 2024-02-06T19:53:48+5:30 2024-02-06T19:57:02+5:30
Sai Tamhankar : सई ताम्हणकरच्या रिलेशनशीपबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान एका मुलाखतीत नात्याबद्दल दिलेले उत्तर ऐकून चाहते हैराण झाले आहेत. मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून कायम सई ताम्हणकरकडे (sai tamhankar) पाहिले जाते. मराठीसह बॉलिवूडमध्येही सईने आपली छाप सोडली आहे. त्यामुळे आज सई कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
'मीमी', 'दुनियादारी', 'हंट', 'तु ही रे', 'नो एन्ट्री' अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये झळकलेली सई लवकरच 'श्रीदेवी प्रसन्न' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
'श्रीदेवी प्रसन्न' या चित्रपटाच्या निमित्ताने सई ताम्हणकर वेगवेगळ्या मुलाखती देत आहेत. या मुलाखतींमध्ये तिने अनेक खुलासे केले आहेत.
नुकतेच तिने मुंबई तकच्या चावडीवर हजेरी लावली होती. त्यावेळी तिला तू सिंगल आहेस की मिंगल असे विचारण्यात आले. त्यावेळी तिने दिलेले उत्तर ऐकून चाहते हैराण झाले आहेत.
उत्तर देताना सईने म्हटले की, ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’. मात्र, सईच्या या उत्तरामुळे चाहते संभ्रमात पडले आहेत.
काही महिन्यांपूर्वी सई ताम्हणकर हिने सोशल मीडियावर आपल्या नात्याची कबुली दिली होती. सिने निर्माता अनिश जोग याच्यासोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर करून सईने प्रेमात पडल्याची कबुली दिली होती.
दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेत करत आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटोदेखील पाहायला मिळतात.
मात्र, आता सई ताम्हणकरने ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’ म्हटल्यामुळे सगळ्यांचा गोंधळ उडला आहे. मात्र, तिने यावर सविस्तर बोलणं टाळलं आहे.
श्रीदेवी प्रसन्न चित्रपटानंतर भक्षक या चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे.