Photos : श्रिया पिळगावकरनं घेतला Sky Diving चा थरारक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 14:04 IST2024-11-18T13:52:41+5:302024-11-18T14:04:54+5:30
श्रिया ही खऱ्या आयुष्यात अत्यंत बोल्ड आणि बिनधास्त आहे.

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक आणि अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही कायम चर्चेत असते.
श्रिया ही खऱ्या आयुष्यात अत्यंत बोल्ड आणि बिनधास्त आहे.
श्रियाला फिरण्याची फार आवड असून ती जगण्याचा मनमुराद आनंद घेते. आता पुन्हा एकदा याचा प्रत्यत आला आहे.
श्रियाने तब्बल 18,000 फुटांवरून उडी मारली आणि स्काय डायव्हिंगचा थरारक अनुभव घेतला.
नुकतंच श्रिया ही न्यूझीलंडमध्ये पोहचली होती. येथेच तिने हे स्काय डायव्हिंग केलं. याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत.
विशेष म्हणजे स्काय डायव्हिंग करण्याची श्रियाची ही पहिली नाही तर दुसरी वेळ आहे. याआधीही तिने हा थरारक अनुभ घेतलेला आहे.
या फोटोंमध्ये श्रिया ही जमिनीपासून कित्येक मीटर उंचीवर तरंगताना दिसून येतेय.
आकाशात उंच उडायला कुणाला आवडणार नाही. विमानाने आपण आकाशात पोहोचतो खरं पण पक्ष्यासारखं उडावं असंही आपल्याला वाटतं. यासाठी स्काय डायव्हिंग केलं जातं.
स्काय डायव्हिंगमध्ये लोक हजारो फूट उंचीवरून पॅराशूटने उडी मारतात.
हवेत काही सेकंद फ्री फॉल मिळतात. तितक्यात ते खाली उतरणार असताना तो पॅराशूट उघडतो. आणि सहज जमिनीवर सुरक्षित लँडिंग करतो. स्कायडायव्हिंग हा साहसप्रेमींसाठी आवडता अनुभव आहे.