सिद्धार्थ जाधव ते कुशल बद्रिके! 'या' कॉलेजमध्ये ऐश्वर्या रायसह शिकलेत हे मराठी कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 14:13 IST2023-05-23T14:07:08+5:302023-05-23T14:13:21+5:30
Marathi Celebrity:मराठी कलाविश्वातील अधिकांश सेलिब्रिटी कोणत्या कॉलेजमध्ये शिकलेत माहितीये का?

आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय-बच्चन. बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या ऐश्वर्याने मुंबईतील डी.जी. रुपारेल या महाविद्यालयातून तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
ऐश्वर्यासह मराठी कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी याच कॉलेजमधून त्यांचं शिक्षण पूर्ण केलंय. त्यामुळे हे कलाकार कोणते ते पाहुयात.
सिद्धार्थ जाधव- मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि मनमिळाऊ अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. आजवर सिद्धार्थने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
तो आज लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने डी.जी. रुपारेल कॉलेजमधून त्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उर्मिला मातोंडकर - बॉलिवूडवर राज्य गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर. आपल्या अभिनयशैलीच्या जोरावर उर्मिलाने बॉलिवूडमध्ये हक्काचं स्थान निर्माण केलं.
उर्मिला आज लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली आहे.
कुशल बद्रिके - चला हवा येऊ द्याचा हुकमी एक्का म्हणजे कुशल बद्रिके. उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो एक कवीदेखील आहे.
कुशल चला हवा येऊ द्यासोबतच अनेक सिनेमांमध्येही झळकला आहे.
सुचित्रा बांदेकर - उत्तम अभिनयशैलीमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे सुचित्रा बांदेकर. आज सुचित्रा यांचं नाव कलाविश्वात आदराने घेतलं जातं.
डी.जी. रुपारेलमध्ये शिकलेल्या सुचित्रा यांनी मालिकांसह, सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच त्यांचा झिम्मा सिनेमा प्रदर्शित झाला.
सखी गोखले - दिल, दोस्ती, दुनियादारी या मालिकेतून सखीने कलाविश्वात पदार्पण केलं.
सखीनेदेखील डी.जी. रुपारेल कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं आहे.
शिवानी बावकर - लागीरं झालं जी या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर. पहिल्याच मालिकेतून शिवानी प्रचंड लोकप्रिय झाली.
शिवानीने लागीरं झालं जीनंतर अनेक मालिकांमध्ये काम केलं. सध्या ती लवंगी मिरची या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.