Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती होणार विभक्त? पत्नीनं हटवलं सोशल मीडियावरुन 'जाधव' आडनाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 12:53 PM2022-06-22T12:53:59+5:302022-06-22T12:58:09+5:30

सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि त्याची पत्नी तृप्तीच्या घटस्फोटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि त्याची पत्नी तृप्ती यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.

सिद्धार्थची पत्नी तृप्ती हिने तिच्या सोशल मीडियावरील नाव बदललून तृप्ती अक्कलवार असे केले आहे. तिने नावामधील जाधव हे आडनाव हटवल्यामुळे सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाच्या चर्चेला जोर धरला आहे.

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ हा तृप्ती आणि त्याच्या दोन मुलींसोबत ट्रीपला गेला होता. त्यावेळी सिद्धार्थनं फक्त मुलींसोबतचे फोटो शेअर केले होते.

सिद्धार्थ आणि तृप्तीनं २००७ मध्ये लग्नगाठ बांधली.

सिद्धार्थ आणि तृप्तीला स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत.

सिद्धार्थ आणि तृप्तीनं झलक दिखला जा या शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमधील तृप्ती आणि सिद्धार्थच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

सिद्धार्थ जाधवने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचालन देखील त्याने केले आहे. अभिनेता रणवीर सिंगसोबत सिद्धार्थ सिम्बा या चित्रपटात झळकला होता.

सिद्धार्थनं डान्स महाराष्ट्र डान्स सिझन-1 या शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारली. त्याच्या दे-धक्का, धुराळा आणि टाईमपास या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. लवकरच सिद्धार्थचा दे धक्काच्या सीक्वलमध्ये झळकणार आहे.