सिंपल पण तितकीच सुंदर! साधेपणाने पुन्हा एकदा सावनी रविंद्रने जिंकली नेटकऱ्यांची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 03:51 PM2024-06-03T15:51:08+5:302024-06-03T15:54:11+5:30

savanee ravindra: नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत साधी पण तितकीच सुंदर दिसत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका म्हणजे सावनी रविंद्र

आपल्या गोड आवाजात तिने प्रत्येक श्रोत्याला मंत्रमुग्ध केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगते.

उत्तम आवाजासोबतच सावनी तिच्या सौंदर्यामुळेही कायम चर्चेत असते. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.

सावनी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत येत असते.

नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत साधी पण तितकीच सुंदर दिसत आहे.

गडद निळ्या रंगाच्या पंजाबी सूटमध्ये तिने हे फोटोशूट केलं आहे.

सावनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी तिच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत.

सावनीने आतापर्यंत अनेक सिनेमा, मालिकांसाठी पार्श्वगायन केलेलं आहे.