सचित पाटीलची पत्नी आहे प्रसिद्ध गायिका,सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 12:00 PM2021-08-23T12:00:00+5:302021-08-23T12:00:00+5:30

चॉकलेट हिरो म्हणूनही अभिनेता सचित पाटील इंडिस्ट्रीमध्ये ओळखला जातो. मालिका आणि सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारत त्याने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. सचितचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चाहते त्याला फॉलो करतात.

त्याच्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येक चाहत्याची इच्छा असते.

पण तुम्हाला माहिती आहे का सचित प्रमाणे त्याची पत्नीदेखील इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे.

सचित पाटीलची पत्नी प्रसिद्ध गायिका असून तिनेही इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

शिल्पा पै असे त्याच्या पत्नीचे नाव आहे.

सचित पाटील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो.

पत्नीसोबतचे अनेक फोटो चाहत्यांना पाहायला मिळतील.

शिल्पा उत्तम गायिका तर आहे पण सौंदर्यातही अभिनेत्रींंनाही टक्कर देते.

शिल्पाने मराठीसोबतच भोजपुरी भाषेत देखील गाणी गायली आहेत.

सचित पाटीलच्या 'क्षणभर विश्रांती' या सिनेमाची गाणीही शिल्पानेच गायली आहेत.

दोघांची जोडी चाहत्यांनाही प्रचंड आवडते. त्यांच्या फोटोंना भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देताना दिसतात.