नाकात नथ, कपाळी चंद्र कोरच डिझायनर साडीत स्मिता शेवाळेचं क्लासी फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 04:56 PM2024-03-22T16:56:08+5:302024-03-22T17:02:49+5:30

Smita shewale:स्मिताच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्मिता शेवाळे. गेल्या कित्येक वर्षांपासून स्मिता मराठी कलाविश्वात सक्रीय आहे.

काही दिवसांपूर्वीच स्मिताने तिचं हक्काचं घर खरेदी केलं. त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे.

स्मिताने अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.

स्मिता सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे.

कॉफी कलरच्या डिझायनर साडीत स्मिताने तिचं फोटोशूट केलं आहे. या साडीत ती ग्लॅमरस दिसत आहे.

स्मिताने अनेक हिंदी, मराठी मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच ती दिग्पाल लांजेकरांच्या सुभेदार या सिनेमात झळकली होती.

सुभेदार या सिनेमात तिने तानाजी मालुसरे यांच्या पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारली आहे.

'यंदा कर्तव्य आहे', 'अथांग', 'कनिका', 'चल लव्ह कर', 'दम असेल तर', 'धामधूम', 'लाडी गोडी', 'वन रूम किचन', 'विठ्ठला', 'चारचौघी', 'मांडला दोन घडीचा डाव', 'वीर शिवाजी', 'मुरांबा' अशा कितीतरी मालिका, सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.

स्मिताला एक मुलगा असून कबीर असं त्याच नाव आहे. स्मिता अनेकदा तिच्या लेकासोबतचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.