ये लाल इश्क..! लाल साडीत खुललं सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 04:01 PM2024-09-09T16:01:02+5:302024-09-09T16:14:21+5:30

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही महाराष्ट्राच्या आघाडीच्या आणि लाडक्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

सोनाली वेगवेगळ्या फोटोशूटमुळे नेहमी चर्चेत असते. अनेकदा ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते

नुकतंच सोनाली कुलकर्णीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती सुंदर दिसते आहे.

सोनाली कुलकर्णीने लाल रंगाच्या साडीत तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये तिचा अंदाज खूपच बोल्ड आणि मोहक दिसतो आहे.

साडी नेसल्यानंतर सोनालीअत्यंत खास आणि लोभस अशी दिसतेय.

सोनालीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले असून त्यांनी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोनालीने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे.

तिने 'अंजिठा', 'पोस्टर गर्ल', 'झपाटलेला २', 'मितवा', 'क्लासमेट' यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

सोनालीनं याचवर्षी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, 'मलाइकोट्टई वालीबान' या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली.