Sonalee Kulkarniने शेअर केले एथनिक लूकमधील फोटो, फोटोंना मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 04:52 PM2022-09-23T16:52:12+5:302022-09-23T17:03:15+5:30

Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीचे एथनिक लूकमधील फोटो झाले व्हायरल

सोनाली कुलकर्णी हिने अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

सोनाली कुलकर्णी हिने नुकतेच इंस्टाग्रामवर एथनिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये सोनाली कुलकर्णीने आबोली रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे.

यात तिने पंजाबी ड्रेससोबत केस बांधले आहेत. या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

सोनाली कुलकर्णीचे हे फोटोशूट व्हायरल झाले आहेत.

सोनाली कुलकर्णी सध्या छोट्या पडद्यावरील डान्स महाराष्ट्र डान्स या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे.

सोनाली कुलकर्णी लवकरच व्हिक्टोरिया या चित्रपटात झळकणार आहे.

तसेच ती छत्रपती ताराराणी या चित्रपटातही दिसणार आहे.