नवरी नटली..! सोनाली कुलकर्णीनं लंडनमधील लग्नाचे फोटो शेअर करत आठवणींना दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 04:17 PM2022-08-29T16:17:10+5:302022-08-29T16:28:09+5:30

Sonalee Kulkarni Kunal Benodekar Wedding Photos : लंडनमध्ये सोनाली-कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. सोनालीने या लग्नाचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने पती कुणालसोबत लंडनमध्ये दुसऱ्यांदा लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. या लग्न सोहळ्याचे फोटो अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोनाली कुलकर्णीने लग्नातील तिच्या लूकचे फोटो शेअर करत लिहिले की, नवरी नटली.

या फोटोत सोनाली कुलकर्णीचा राजेशाही थाट पाहायला मिळतो आहे.

यात सोनाली कुलकर्णीने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केले आहे.

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर तिचा लग्नसोहळ्यांची मालिका प्रदर्शित करण्यात आली. त्याची झलक सोनालीनं शेअर केलेल्या फोटोत पाहायला मिळते आहे.

सोनाली कुलकर्णी व कुणाल बेनोडेकर यांनी कोरोना काळात लग्न करून फॅन्सना सुखद धक्का दिला होता.

हे लग्न दुबईत झालं. अगदी चार दोन लोकांच्या उपस्थितीत एका मंदिरात अगदी साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला होता.

दुबईचं लग्न अगदी सोनाली-कुणालच्या घरच्यांनी आणि मित्र- मैत्रिणींनी व्हिडिओ कॉलवरच पाहिलं होतं. दुबईच्या लग्नात ना विधी होत्या, ना हौस मौज.

सोनाली व कुणालनं पुन्हा एकदा विधीवत लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला हा निर्णय अमलातही आला. यावेळी त्यांनी लग्नासाठी लंडनची निवड केली.

सोनाली व कुणालच्या लंडनमधील लग्नसोहळ्याचे फोटो, व्हिडीओ आता समोर आले आहेत.‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा शाही लग्नसोहळ्याची मालिका प्रदर्शित झाली.

लंडनमध्ये सोनालीनं धुमधडाक्यात लग्न केलं. तिच्या लग्नाची संपूर्ण मालिका चाहत्यांना पाहता आली. एखाद्या मराठी अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोनाली याची पहिली मानकरी ठरली आहे.