ही आहेत मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्याची मुलं, पाहा त्यांचे क्यूट फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 07:55 PM2021-03-01T19:55:59+5:302021-03-01T20:11:33+5:30

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी आणि त्याची पत्नी लीना आराध्ये-जोशी सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे

स्वप्नील-लीना 16 डिसेंबर 2011 रोजी लग्नाच्या बेडीत अडकले होते.

स्वप्निल आणि लीना यांचे अरेंज मॅरेज आहे. त्यामुळे त्यांचा रितसर बघण्याचा कार्यक्रम झाला होता. परंतु हा कार्यक्रम काही टिपिकल कांदे-पोह्याचा नव्हता. तर या दोघांची पहिली भेट एका कॉफी शॉपमध्ये झाली होती.

मायरा आणि राघवची त्यांच्या मुलांची नावं आहेत.

स्वप्निलने लीनाला पहिल्याच भेटीत एक अट घातली होती. त्याने सांगितले होते की, तू लग्नानंतर माझ्या आई-वडिलांसोबत राहावे अशी माझी इच्छा आहे. परंतु स्वप्निल काही बोलण्याच्या आधीच लीनाने या गोष्टीला होकार दिला.

मायरा ही स्वप्निलची मोठी मुलगी आहे तर राघव तिच्यापेक्षा काही वर्षांनी लहान आहे.

स्वप्निलच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला मायरा आणि राघवचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

मायरा आणि राघव हे दोघेही प्रचंड क्यूट आहेत.

मायरा आणि राघव यांच्यात खूपच छान बॉण्डिंग आहे.