तेजस्विनी पंडितनं शेअर केले नवे PHOTOS, म्हणाली "आयुष्य गाडीतच चाललं आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:38 IST2025-03-11T15:30:50+5:302025-03-11T15:38:19+5:30

अभिनेत्रीच्या सौंदर्याला तर तोडच नाही!

मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून अभिनेत्री तेजस्विनी पंडितला (Tejaswini Pandit) ओळखले जाते.

तेजस्विनी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर ती व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

आताही तिनं काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले (Tejaswini Pandit Shared Latest Beautiful Photos) आहेत. या फोटोंमध्ये ती गाडीमध्ये बसलेली दिसतेय.

फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, मराठीतलं तुमचं आवडतं गाणं कोणतं ?? माझी तुमची आवड जुळली तर पुढच्या पोस्ट ला तुम्ही सुचवलेलं गाणं. ह्या निमित्ताने तरी तुमच्याशी संभाषण होईल नाही का ? ता.क कार selfies वाढलेत. आयुष्य गाडीतच चाललं आहे असं वाटतंय". या पोस्टवर चाहत्यांनी त्यांना आडणारे गाण्याबद्दल सांगितलं. तर अनेकांनी तेजस्विनीच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

तेजस्विनीने राखाडी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर त्यावर तिनं ऑक्सीडाइज्ड नथ घातलेली दिसतेय. यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे.

गाडीमध्येच तिनं वेगवेगेळ्या पोझ देत फोटो काढले आहेत. तिचे हा लूक चाहत्यांना आवडला आहे.

अभिनेत्री असण्याबरोबरच तेजस्विनी एक निर्माती आणि उद्योजिकादेखील आहे. मराठीबरोबरच तिने बॉलिवूड आणि साऊथमध्येही काम केलं आहे.

'आदिपुरुष' या हिंदी सिनेमात ती झळकली होती. तर 'अहो विक्रमार्का' या सिनेमातून तिने साऊथमध्ये पदार्पण केलं.

कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्री तेजस्विनी पंडित बरेच दिवस मोठ्या पडद्यावर दिसलेली नाहीये.

सध्या ती निर्मितीत जास्त सक्रिय आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर केव्हा दिसणार असा प्रश्न तिला विचारला जात आहे.