Sonalee Kulkarni : मराठी सिनेविश्वातील 'अप्सरा' रुपेरी पडद्यापासून आहे गायब, ती सध्या आहे कुठे?, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:41 IST2025-04-07T19:29:37+5:302025-04-07T19:41:45+5:30
Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या काय करते?

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने सिनेमात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
सोनाली कुलकर्णी बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यावरून गायब आहे.
सोनाली शेवटची मलाइकोट्टाई वालिबान या मल्याळम सिनेमात झळकली आहे. तेव्हापासून ती रुपेरी पडद्यावर काम करताना दिसली नाही.
सध्या सोनाली कुलकर्णी परदेशात व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसते आहे.
सोनाली सध्या जपानमध्ये फॅमिलीसोबत फिरते आहे आणि तिथले फोटो शेअर करताना दिसते आहे.
नुकतेच तिने जपानमधील हिरोशिमा पीस मेमोरियल पार्कमधील फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सोनाली खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
सोनाली कुलकर्णी लवकरच 'महाराणी ताराराणी' आणि 'रावसाहेब' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.