'टाईमपास'मधील प्राजू दिवसेंदिवस होत चाललीय ग्लॅमरस, आता दिसते खूप वेगळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:46 IST2025-01-18T11:42:09+5:302025-01-18T11:46:33+5:30

Ketaki Mategaonkar : 'टाईमपास' चित्रपट रिलीज होऊन बराच काळ उलटला असून केतकी माटेगावकरमध्ये खूपच बदल झालेला पाहायला मिळत आहे.

२०१४ साली टाईमपास चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात दगडू आणि प्राजूने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या चित्रपटात प्राजूची भूमिका अभिनेत्री केतकी माटेगावकरने निभावली होती.

प्राजूच्या भूमिकेतून केतकी माटेगावकरला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

टाईमपास चित्रपट रिलीज होऊन ११ वर्षांचा काळ उलटला असून केतकीमध्ये खूपच बदल झालेला पाहायला मिळत आहे.

केतकी माटेगावकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.

दरम्यान आता केतकी माटेगावकरने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत केतकी खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

केतकी माटेगावकरचे हे ग्लॅमरस फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

टाईमपासमधल्या प्राजूमध्ये खूप मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळतंय. तिच्या इन्स्टाग्रामवर नजर टाकली तर लक्षात येत तिच्यात किती बदल झाला आहे.

टाईमपासमधील सोज्वळ प्राजू आता भलतीच बोल्ड आणि ग्लॅमरस झालीय. तिचे हे ट्रान्सफॉर्मेशन थक्क करणारे आहे.

केतकी माटेगावकर टाईमपास, काकस्पर्श, तानी सिनेमात झळकली आहे.अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिका ही आहे.याशिवाय तिने अनेक मालिकांसाठी पार्श्वगायनदेखील केलं आहे. काही सिनेमांसाठीही तिने तिचा आवाज दिला आहे.