गावच्या मातीशी जोडलेला अवघ्या २ तासांचा हा मराठी सिनेमा! हसून हसून दुखेल पोट; तुम्ही पाहिलाय का?

By देवेंद्र जाधव | Updated: February 7, 2025 18:07 IST2025-02-07T17:38:50+5:302025-02-07T18:07:19+5:30

२००८ साली आलेला हा मराठी सिनेमा पाहून तुमचं निखळ मनोरंजन होईल यात शंका नाही. तुम्ही पाहिलाय का सिनेमा?

२००८ साली हा मराठी सिनेमा आला. नवीन विषय आणि गावच्या मातीशी जोडलेली नाळ त्यामुळे हा सिनेमा चांगलाच गाजला.

या सिनेमाचं नाव आहे 'वळू'. उमेश कुलकर्णी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. आजही हा सिनेमा सिनेप्रेमींचा आवडता सिनेमा आहे

अतुल कुलकर्णीची सिनेमात प्रमुख भूमिका आहे. अतुलच्या भावाला वळूबद्दल माहिती मिळवून त्यावर डॉक्यूमेंट्री बनवायची असते. त्यामुळे अतुल गावात येतो. मग पुढे सिनेमात येणारी धमाल तुम्हाला पाहायला मिळते.

अतुल कुलकर्णी, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावंत, वीणा जामकर हे दिग्गज कलाकार सिनेमात दिसले.

पुणे आंंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २००८ मध्ये हा सिनेमा चांगलाच गाजला. २००८ चे बहुतेक सर्व मानाचे पुरस्कार 'वळू' सिनेमाला मिळाले

या सिनेमाची कथा आणि पटकथा अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि उमेश कुलकर्णी यांनी मिळून लिहिली होती.

'वळू' सिनेमा हा मराठी सिनेसृष्टीला एक कलाटणी देणारा सिनेमा ठरला. 'वळू' सिनेमानंतर ग्रामीण पार्श्वभूमी असलेले आणि मातीशी जोडणारे अनेक सिनेमे मराठीमध्ये आले