Ved Marathi Movie : 'वेड तुझा' गाण्यात 'जिया शंकर'वर खिळल्या नजरा; रितेशसोबतची केमिस्ट्री बघून चाहते घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 01:25 PM2022-12-11T13:25:27+5:302022-12-11T13:34:16+5:30

'वेड तुझा विरह वणवा' गाण्याने तरुणाईला अक्षरश: वेडच लावले आहे. साहजिकच आहे अजय अतुलने संगीतबद्ध केलेल्या गाण्याची जादू काही वेगळीच. रितेश देशमुख जेनेलियाच्या 'वेड' या मराठी सिनेमाची चाहत्यांमध्ये चप्रचंड उत्सुकता आहे. मात्र वेडच्या टायटल सॉंग मध्ये रितेशसोबत रोमान्स करणारी अभिनेत्री कोण असा प्रश्न पडला असेल. तर ती आहे 'जिया शंकर'.

जिया शंकर हिने टेलिव्हिजनमधुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मेरी हानिकारक बिवी ही तिची गाजलेली मालिका.

वेड तुझा विरह वणवा या गाण्यात रितेश आणि जिया शंकर रोमॅन्टिक अंदाजात दिसत आहेत. समुद्रकिनारी रितेश आणि जियाचा रोमान्स चित्रित करणायात आला आहे.

त्यानंतर तिने काटेलाल अॅंड सन्स या मालिकेत मुख्य भुमिका साकारली. याशिवाय क्वीन्स है हम, प्यार मॅरेज श्श या मालिकेतही ती दिसली.

जियाचा जन्म मुंबईत झाला असून तिने वयाच्या १६ व्या वर्षापासूनच अभिनय करायला सुरुवात केली.

एंथा अंडगा उन्नवे या तेलगु सिनेमातुन तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. तिने अनेक तेलगु आणि तमिळ सिनेमांमध्ये भुमिका केली आहे.

वेड सिनेमातुन जिया मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण करत आहे. वेडच्या टायटल सॉंग मध्ये रितेश आणि तिची केमिस्ट्री चाहते पसंत करत आहेत.

जिया सोशल मीडियावरही सक्रीय आहे. वेड गाण्यानंतर तिचा चाहतावर्ग आणखी वाढला आहे. तिच्या हॉट फोटोंवर तर चाहते घायाळ झालेत.

वेडमध्ये जियाचा अभिनय, तिची आणि रितेशची जोडी बघण्यासाठीही चाहते उत्सुक आहेत.