"तुमची आठवण येते पप्पा...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश भावुक, शेअर केले Unseen फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 09:57 AM2024-08-14T09:57:51+5:302024-08-14T10:09:34+5:30

Vilasrao Deshmukh : आज विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने रितेशने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

रितेश देशमुख हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. रितेश हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज नेते विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे.

आज विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने रितेशने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावुक झाला आहे. रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन विलासराव देशमुख यांचे काही unseen फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करत रितेशने भावुक पोस्ट लिहिली आहे. "My forever, my everything…", असं कॅप्शन त्याने फोटोंना दिलं आहे.

त्याबरोबरच "तुमची आठवण येते पप्पा..." असंही रितेशने पुढे म्हटलं आहे.

रितेशच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत दिवंगत नेते विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहिली आहे.

रितेश कायमच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. देशमुख कुटुंब हे लातुरच्या राजकारणातील नावाजलेलं घराणं आहे.

विलासराव देशमुख यांचं नाव महाराष्ट्रातील प्रतिष्ठित नेत्यांमध्ये कायमच घेतलं जातं. १९९९ ते २००८ या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होती. १४ ऑगस्ट २०१२ रोजी त्यांचं निधन झालं.