'बिग बॉस'च्या सेटवर सिद्धार्थ जाधव जेव्हा पहिल्यांदा सलमानला भेटला, अभिनेत्याला पाहून भाईजान म्हणाला- "अरे तू..."

By कोमल खांबे | Updated: March 27, 2025 13:30 IST2025-03-27T13:23:47+5:302025-03-27T13:30:13+5:30

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने त्याच्या टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्थान निर्माण केलं. अभिनेत्याचं सर्वत्र कौतुकही होताना दिसतं. मात्र, खुद्द सलमान खानने सिद्धार्थचं कौतुक केलं होतं.

सिद्धार्थ जाधव हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मराठीसोबतच त्याने बॉलिवूडही गाजवलं आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने त्याच्या टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्थान निर्माण केलं.

अभिनेत्याचं सर्वत्र कौतुकही होताना दिसतं. मात्र, खुद्द सलमान खानने सिद्धार्थचं कौतुक केलं होतं.

सिद्धार्थने अमोल परचुरेंच्या 'कॅच अप' या पॉडकास्टमध्ये हा किस्सा सांगितला. तो म्हणाला, "मी महाराष्ट्राला, मराठी इंडस्ट्रीला माझ्या कामातून रिप्रेझेंट करतो. कितीतरी मराठी कलाकार आहेत. पण, मला हे सौभाग्य मिळालं आहे".

"मी सुपरस्टार सिनेमाचं शूटिंग करत होतो. आणि सलमान सर तिकडे बिग बॉसचं शूटिंग करत होते. मी महेश सरांना फोन केला. त्यांना म्हटलं की सलमान सर शूट करत आहेत".

"ते मला म्हणाले जा भेटून घे. त्यांना मी भेटायला गेलो. त्यांच्या बाजूला अतुल अग्निहोत्री बसले होते".

"मला बघताच सलमान सर म्हणाले अरे ये ये...अतुल हा एक हुशार अभिनेता आहे".

"सलमान सर दे धक्काचा हिंदी रिमेक करणार होते. त्यामुळे त्या सिनेमात त्यांनी माझं काम पाहिलं होतं".

"नच बलियेच्या वेळी सलमान सरांनी तू भारतातला एक उत्तम अभिनेता आहेस, असं माझं कौतुक केलं. ही कौतुकाची थाप मराठी सिनेमा, मराठी इंडस्ट्रीमुळे आहे. त्यामुळे मला हे आवडतं".