प्रेग्नंसीनंतर 'वहिनीसाहेब' धनश्री कडगावकरचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 12:52 PM 2021-11-23T12:52:30+5:30 2021-11-23T13:04:50+5:30
अभिनेत्री धनश्री कडगावकर तिच्या प्रेग्नंसीदरम्यानही सोशल मीडियावर सक्रीय होती. बाळाच्या जन्मानंतरही ती चाहत्यांच्या संपर्कात होती. बाळाच्या जन्मानंतर तिचे वजनही वाढले होते. धनश्रीने वाढलेल्या वजनाबाबत पोस्टही शेअर केली होती.
१३ महिन्यांनतर तिची जुनी जीन्सही तिला प्रॉपर फिट बसली होती.
वाढलेल्या वजनामुळे जुने कपडेच तिला घालणे शक्य होत नव्हते.
त्यामुळे वजन कमी केल्यानंतर जीन्सही तिला प्रॉपर फिट बसत असल्याचा आनंद व्यक्त केला होता.
आता पुन्हा एकदा धनश्री पूर्वीसारखीच ग्लॅमरस लूक दिसू लागली आहे.
नित्यनियमाने ती वर्कआऊट, योग्य डाएट करत तिने आपलेले वाढलेले वजनही कमी केल्याचे पाहायला मिळतंय.
सोशल मीडियावर तिने पुन्हा एकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
यात प्रेग्नंसीनंतर तिचे झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही थक्क होत आहे.
तिने स्वतःवर प्रचंड मेहनत घेतल्याचे फोटोत पाहायला मिळेल.