Guess Who: फोटोतील या गोंडस मुलीला ओळखलंत का? गाजवतेय मराठी मालिकाविश्व

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 01:53 PM2024-12-03T13:53:58+5:302024-12-03T14:06:36+5:30

बऱ्याचदा सोशल मीडियावर कलाकार मंडळींचे बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात.

सेलिब्रिटी सोशल मीडियावर अनेकदा त्यांचे बालपणीचे फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा देतात. शिवाय चाहते देखील त्यांच्याबद्दल जाणूस घेण्यास उत्सुक असतात.

दरम्यान, सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीणीचा बालपणीचा एक फोटो समोर आला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'आई कुठे काय करते' फेम मधुराणी प्रभुलकर आहे.

मधुराणीचा हा बालपणीचा फोटो पाहून चाहते तिला ओळखू शकले नाहीत.

मधुराणी प्रभुलकरने ही मराठी मनोरंजनविश्वातील नावाजलेली अभिनत्री आहे. गेली ५ वर्षे स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन केलं.

दरम्यान, अलिकडेच या लोकप्रिय मालिकेने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ३० नोव्हेंबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला.

अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. शिवाय यातील कलाकारांना वेगळी ओळख मिळवून दिली.

'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारून मधुराणी प्रभुलकर घराघरात पोहोचली.

या मालिकेने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. आता 'आई कुठे काय करते' संपल्यानंतर मधुराणी भावुक झाली आहे.