कपाळी चंद्रकोर अन् नाकी नथ; 'रंग माझा वेगळा' फेम अनघा अतुलचा मराठमोळा साजशृंगार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 01:57 PM2024-11-30T13:57:22+5:302024-11-30T14:07:01+5:30

'रंग माझा वेगळा' फेम अभिनेत्री अनघा अतुलच्या लेटेस्ट फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारून अनघा प्रकाशझोतात आली.

'रंग माझा वेगळा' या मालिकेने जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्यातील कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात.

दरम्यान, अभिनेत्री अनघा अतुलने नुकतंच फोटोशूट केलंय. या फोटोंमध्ये ती फारच सुंदर दिसते आहे.

या फोटोंमध्ये अनघा गुलाबी साडी, कपाळावर चंद्रकोर अन् नाकात नथ अशा मराठमोळ्या अंदाजात पाहायला मिळते आहे.

अलिकडेच अभिनेत्रीच्या भावाचं लग्न झालं. त्यासाठी तिने हा खास लूक केला होता. अनघाचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांना खूपच आवडले आहेत.

अनघा अतुल भगरे ही भगरे गुरुजींची कन्या आहे.

प्रसिद्ध ज्योतिषी अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी झी मराठी वाहिनीवरील 'वेध भविष्याचा' आणि 'घेतला वसा टाकू नको' या पौराणिक मालिकांमध्ये काम केले आहे.