'उर्फीचे गुण घेतले का?', गुलाबाच्या फुलांनी अंग झाकल्यामुळे ही मराठमोळी अभिनेत्री झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 10:14 AM2023-02-14T10:14:11+5:302023-02-14T10:18:09+5:30

Urfi Javed : टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद चित्रविचित्र फॅशनमुळे सातत्याने चर्चेत येत असते. दरम्यान आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं टॉपलेस होऊन गुलाबाच्या फुलांनी अंग झाकून फोटोशूट केले आहे.

टेलिव्हिजन अभिनेत्री उर्फी जावेद चित्रविचित्र फॅशनमुळे सातत्याने चर्चेत येत असते. दरम्यान आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं टॉपलेस होऊन गुलाबाच्या फुलांनी अंग झाकून फोटोशूट केले आहे.

ही अभिनेत्री म्हणजे कृतिका गायकवाड. ती मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री आणि नृत्यांगणा आहे.

कृतिका गायकवाड सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो शेअर करत असते.

दरम्यान आता तिने व्हॅलेंटाइन डे निमित्ताने स्पेशल फोटोशूट केले आहे, जे चर्चेत आले आहे.

कृतिका गायकवाडने टॉपलेस फोटोशूट केले आहे आणि गुलाबांनी अंग झाकले आहे. खाली डेनिमची पॅण्ट घातली आहे.

कृतिका गायकवाडच्या या फोटोशूटला काहींनी पसंती दर्शवली आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे.

एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिले की, उर्फीचे गुण घेतले का?, तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले फॉलोव्हर्ससाठी काही पण

आणखी एका युजरने लिहिले की, तू पण गुलाबसारखी गुलाबी वाटते आहेस.

कृतिका गायकवाडचे हे फोटोशूट व्हायरल होताना दिसत आहे.

कृतिकाने काही मराठी चित्रपटांमध्ये लावणी आणि आयटम साँग केले आहेत.