Met Gala 2022: रेड कार्पेटवरची ही अतरंगी फॅशन पाहून डोक्यावर हात माराल By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 01:25 PM 2022-05-03T13:25:06+5:30 2022-05-03T13:59:56+5:30
Met Gala 2022 Red Carpet Fashion: दरवर्षी मेट गाला हा चॅरिटेबल फॅशन इव्हेंट रंगतो आणि दरवर्षी या इव्हेंटमधील अतरंगी फॅशनची चर्चा होते. यंदाही तेच. या शोच्या रेड कार्पेटवरचे लुक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. दरवर्षी मेट गाला हा चॅरिटेबल फॅशन शो रंगतो आणि दरवर्षी या शोमधील अतरंगी फॅशनची चर्चा होते. यंदाही तेच. या शोच्या रेड कार्पेटवरचे लुक पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
2 मे रोजी न्यूयॉर्क शहराच्या मेट्रोपोलिटन म्युझिअम ऑफ आर्ट याठिकाणी ‘मेट गाला 2022’ पार पडला. यंदा ‘ग्लिडेड ग्लॅमर, व्हाइट टाय’ अशी या महोत्सवाची थीम होती.
या महोत्सवाच्या रेड कापेर्टवर अतरंगी फॅशनचे नमुने पाहायला मिळाले. भारतातून व्यावसायिक नताशा पूनावाला हिने मेट गालाच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. सब्यसाची मुखर्जीने तिचा हा लुक डिझाईन केला होता.
मेट गाला इव्हेंट म्हणजे कपडे, हेअरस्टाईल आणि मेकअप यांची अशीच विचित्र दुनिया. क्रिकेटमध्ये जसे वर्ल्डकप महत्त्वाचे, धार्मिक विधींमध्ये कुंभमेळा महत्त्वाचा, पुरस्कारांमध्ये ऑस्कर महत्वाचा, तसेच सौंदर्य जगत तसेच फॅशन जगातात मेट गाला हा सोहळा महत्त्वाचा.
त्यामुळे एवढ्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सेलिब्रिटी जय्यत तयारी करतात आणि या सोहळ्यात अवतरतात. या सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर त्यांची चर्चा जगभर होते.
संगीत, चित्रपट, फॅशन, मॉडेलिंग या क्षेत्रातील प्रसिद्ध लोक या सोहळ्यात सहभागी होत असतात.
1946 पासून या सोहळ्याची सुरुवात झाली. दरवर्षी या इव्हेंटसाठी एक थीम ठरवून दिली जाते. या थीमनुसारच सेलिब्रिटींना त्यांचे कपडे, मेकअप, हेअरस्टाईल या सगळ्या गोष्टी ठरवायच्या असतात.
या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी कोट्यावधी रुपये मोजावे लागतात. मुळात निधी जमवणं हाच या इव्हेंटचा हेतू आहे.
मेट्रोपॉलिटन म्युझिअम ऑफ आर्ट्स हे अमेरिकेतील सर्वात मोठं आर्ट म्युझियम आहे. या म्युझियमच्या कॉश्च्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी गोळा करण्यासाठी दरवर्षी मेटा गालाचं आयोजन होते.
यामध्ये हजेरी लावण्याासाठी तिकिट काढावं लागतं आणि यातून निधी उभा केला जातो. या फॅशन इव्हेंटला हजेरी लावणं अतिशय प्रतिष्ठेचं मानलं जातं.
प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण या अभिनेत्रीही या सोहळ्यात काही वर्षांपूर्वी सहभागी झाल्या होत्या. तेव्हा त्यांनीही असेच विचित्र पेहराव केले होते.
मेल गाला इव्हेंटवरून सोशल मीडियावर मीम्सचा पूर येतो. अनेक सेलिब्रिटी ट्रोलही होतात. पण मेट गाला हा इव्हेंची प्रतीक्षा दरवर्षी होते आणि होत राहणार.