ऑफ शोल्डर ब्लाऊजमध्ये Mira Rajput ने नेसली साडी, फोटोशूटवर खिळल्या नजरा By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 03:27 PM 2021-12-27T15:27:08+5:30 2021-12-27T15:49:55+5:30
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची( Shahid Kapoor) पत्नी मीरा राजपूत (Mira Rajput Kapoor) तिच्या स्टाईल स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. लग्नापासून मीरा राजपूत तिच्या फॅशनमुळे चर्चेत आहे. मीरा राजपूतच्या या नवीन फोटोशूटने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने सिल्कच्या साडीत नवीन फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये मीराने ऑफ शोल्डर ब्लाउजसोबत ही साडी नेसली आहे.
मीराचा हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मीरा राजपूतने अलीकडेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर जयंती रेड्डी यांच्या विंटर कलेक्शन 2022 साठी हे फोटोशूट केले आहे.
जयंती रेड्डी यांनी मीरा राजपूतची तिच्या खास कलेक्शनसाठी निवड केली होती.
या विंटर कलेक्शन फोटोशूटचे फक्त दोनच फोटो समोर आले आहेत.
एका फोटोमध्ये मीरा पीच रंगाच्या सिल्क साडीत दिसत आहे, ज्यावर तिने ऑफ शोल्डर ब्लाउजवर साडी नेसल्याचे दिसत आहे.
दुसऱ्या एका फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे.