'मिर्झापूर' फेम श्वेता त्रिपाठीच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांना केले घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 20:15 IST2019-04-15T20:13:32+5:302019-04-15T20:15:50+5:30

अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेली वेबसीरिज 'मिर्झापूर'मध्ये गोलू गुप्ताची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता त्रिपाठीने नुकतेच सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
'मिर्झापूर'मधील एका सीनमुळे श्वेता खूप चर्चेत आली होती.
या वेबसीरिजच्या आधी श्वेता त्रिपाठी 'हरामखोर' चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मुख्य भूमिकेत झळकली होती.
श्वेताने अभिनय क्षेत्रातील करियरला सुरूवात 'क्या मस्त है लाइफ' मालिकेतून केली होती.
या मालिकेनंतर श्वेता 'मसान' चित्रपटात अभिनेता विकी कौशलसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. यातील तिच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले होते.
श्वेता लवकरच अॅमेझॉ़न प्राईमवरील 'लाखों में एक' या सीरिजच्या पुढील सीझनमध्ये दिसणार आहे.
श्वेताचा जन्म ६ जुलै, १९८५ साली दिल्लीत झाला आहे.
श्वेता त्रिपाठी यापूर्वीही कित्येक वेळा सोशल मीडियावर बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.