mostly sane youtuber prajakta koli s nepali boyfriend vrishank khanal know about him
प्राजक्ता कोळीचा नेपाळी बॉयफ्रेंड आहे तरी कोण? साखरपुड्याच्या फोटोंनी वेधलंय लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 03:40 PM2023-09-22T15:40:27+5:302023-09-22T15:51:17+5:30Join usJoin usNext प्राजक्ताचा बॉयफ्रेंड वृशांक नेपाळी आहे. प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल अॅक्टिव्हिस्ट 'मोस्टली सेन' (Mostly Sane) ऊर्फ प्राजक्ता कोळी (Prajakta Mali) नेहमीच तिच्या कामाने सर्वांना प्रभावित करत असते. साध्या युट्यूब चॅनलपासून सुरुवात करुन आज तिने जगभरात नाम कमावलं आहे. प्राजक्ता तिच्या 'मोस्टली सेन' या चॅनलवर मनोरंजनात्मक व्हिडिओ पोस्ट करत असते. तर रिअल टॉक ट्युझडेमधून ती वेगवेगळ्या क्षेत्रात लोकप्रिय असलेल्या सेलिब्रिटींच्या मुलाखती घेत असते. प्राजक्ता स्वत: पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करते. तिच्या अनेक पोस्टमधून हे समोर आलं आहे. 2021 साली प्राजक्ताला तत्कालीन अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा यांना भेटण्याची संधी मिळाली. मुलींच्या शिक्षणासाठी सुरु झालेल्या क्रिएटर्स फॉर चेंजमध्ये भारताकडून प्राजक्ता सहभागी होती. प्राजक्ताचा प्रवास तसा खूपच इंटरेस्टिंग आहे. तिने अगदी कमी वयात मोठं यश मिळवलंय. नुकतीच ती बिल गेट्स फाऊंडेशनच्या इव्हेंटमध्येही सहभागी झाली आहे. नुकतीच प्राजक्ताने तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. प्राजक्ता गेल्या १२ वर्षांपासून वृशांक खनालसोबत (Vrishank Khanal) रिलेशनशिपमध्ये आहे. कॉलेजपासूनच दोघं एकमेकांना डेट करत होते. आश्चर्य म्हणजे वृशांक नेपाळी आहे. तो ३४ वर्षांचा असून एक वकील आहे. त्याचा जन्म नेपाळचा असला तरी त्याचं शिक्षण मुंबईतच झालंय. वृशांक वडील जगन खनाल आणि आई सबिना खनाल आहे. तसंच त्याला मनोग्या खनाल ही एक बहीण आहे. वृशांकला गिटार वाजवण्याची आवड आहे. तसंच त्याला गोल्फ खेळायलाही आवडतं. वृशांक बुलेटप्रेमी आहे. त्याच्याकडे रॉयल एन्फिल्ड इंटरसेप्टर 650 आहे. वृशांक आणि प्राजक्ताच्या कुटुंबाचाही खास बाँड आहे. अनेकदा वृशांक प्राजक्ताच्या घरी विविध सण आणि इव्हेंट्समध्ये दिसला आहे. त्याने नेहमीच प्राजक्ताला तिच्या कामात पाठिंबा दिलाय. अगदी केबीसीच्या मंचावर प्राजक्ता कोळी आली असता तिने सोबत वृशांकला नेले होते.टॅग्स :सोशल मीडियायु ट्यूबSocial MediaYouTube