Net worth: लक्झरी कार, लाखोंचं मानधन! 28 वर्षी सिद्धू मूसेवाला होता कोटयवधींचा मालक By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 02:59 PM 2022-05-30T14:59:47+5:30 2022-05-30T15:02:54+5:30
Sidhu moosewala:सध्या सोशल मीडियावर सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबासह त्यांच्या संपत्तीविषयी चर्चा रंगली आहे. त्यामुळे सिद्धू मूसेवाला यांचं एकूण नेटवर्थ किती होते ते पाहुयात. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
मानसाच्या जवाहरके गावाजवळ मूसेवाला यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर त्यांना तातडीने मानसा येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली असून सर्व स्तरांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. सोबतच त्यांच्याशी निगडीत अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत.
सध्या सोशल मीडियावर सिद्धू मूसेवाला यांच्या कुटुंबासह त्यांच्या संपत्तीविषयी चर्चा रंगली आहे. त्यामुळे सिद्धू मूसेवाला यांचं एकूण नेटवर्थ किती होते ते पाहुयात.
सिद्धू मूसेवाला उत्तम रॅपर असण्यासोबतच तो एक गायक, गीतकार आणि अभिनेतादेखील होता. आजवरच्या कारकिर्दीमध्ये त्याने अनेक पंजाबी म्युझिक अल्बम आणि सिनेमांमध्ये काम केलं होतं.
पंजाबी कलाविश्वात विशेष लोकप्रिय असलेला सिद्धी मूसेवाला अवघ्या २८ वर्षांचा होता. परंतु, या कमी वयात त्याने अमाप संपत्ती गोळा केली होती.
सिद्धूकडे जवळपास ३५ कोटींची संपत्ती होती. ही संपत्ती त्याने त्याच्या टॅलेंटच्या जोरावर मिळवली होती.
सिद्धू नाईट क्लबमध्ये एक शो करण्यासाठी ६ ते ८ लाख रुपये मानधन घ्यायचा. तर लाइव्ह शो साठी १५ ते २० लाख रुपये.
सिद्धू भारतासह कॅनडा, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे म्युझिक शो करायचा.
सिद्धूला गाड्यांची विशेष आवड होती. त्यामुळे त्याच्याकडे७५.०३ लाखांची रेंज रोव्हर, ४५.६ लाखांची फॉर्च्युनर, १७.०७ लाखांची स्कोरिया, ८ ते ९.०२ लाखांची स्विफ्ट डिझायर आणि १.१५ लाखांची बुलेट, ७५००० हजारांची अॅक्टिव्हा होती.
मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते.
सिद्धू मूसेवालाने गुरु नानक देव इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण घेतलं होतं. तो २०१६ मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर झाला होता.