mrunal thakur turns 32 know about her struggle days when she had suicidal thoughts
'लोकलमधून उडी मारायची इच्छा व्हायची...' आज मराठमोळी अभिनेत्री बनलीये सर्वांची पहिली पसंत By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 10:36 AM2023-08-01T10:36:39+5:302023-08-01T10:46:11+5:30Join usJoin usNext मराठमोळी अभिनेत्री आज साऊथ आणि बॉलिवूडमध्ये करतेय राज्य घरातून अभिनयाचा वारसा नसातानाही सिनेइंडस्ट्रीत एंट्री घेणं आणि तिथे टिकणं तसं कठीणच. प्रचंड स्ट्रगल, कित्येक महिने काम न मिळणं, ऑडिशन्समध्ये रिजेक्ट होणं, बिकट आर्थिक परिस्थिती अशा अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. त्यातूनही अनेक कलाकार सगळ्या संकटांवर मात करत यशस्वी होतात. टीव्ही ते साऊथ सिनेमा आणि बॉलिवूड असा प्रवास करणारी सध्याची आघाडीची अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) आज ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. धुळ्यात जन्मलेल्या मृणालने अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं अन् सुरु झाला तिचा संघर्षपूर्ण प्रवास. मृणालचा प्रवास टेलिव्हिजनमधून सुरु झाला. 'मुझसे कुछ कहती है खामोशिया' या मालिकेतून तिने पदार्पण केलं. नंतर तिने रिएलिटी शो 'नच बलिए' मध्ये सहभाग घेतला. तर 'कुमकुम भाग्य' मालिकेत तिने साकारलेल्या बुलबुल या भूमिकेने तिला खरी लोकप्रियता मिळाली. 2018 मध्ये मृणालने 'लव्ह सोनिया' या इंडो अमेरिकन चित्रपटातून सिनेक्षेत्रात पदार्पण केलं. नंतर ती हृतिकच्या 'सुपर 30' सिनेमात दिसली आणि तिचा बॉलिवूडमध्ये प्रवास सुरु झाला. तर गेल्या वर्षी आलेल्या 'सीतारामम' सिनेमाने तिने प्रेक्षकांना अक्षरश: भुरळ घातली. मृणाल ठाकूरचा हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. आपल्या संघर्षाच्या दिवसांना उजाळा देत ती म्हणाली, 'मला वाटायचं जर मी चांगलं काम करु शकत नाही तर मी आयुष्यात काहीच करु शकत नाही. मला वाटलं होतं माझं लग्न २५ व्या वर्षी होईल. नंतर मुलं होतील. पण मला ते नव्हतं करायचं.' ती पुढे म्हणाली, 'मी लोकलने प्रवास करायचे. अनेकदा दारात उभी असताना चालत्या ट्रेनमधून उडी मारावी असं माझ्या मनात यायचं. वयाच्या १७ व्या वर्षी मुंबईत एकटं राहणं सोपं नाही. तुम्हाला घराचं भाडं, जेवण हे सगळं स्वत:च बघावं लागतं. माझे वडील बँकेत होते त्यामुळे मी खात्यातून ५०० रुपये जरी काढले तरी त्यांना लगेच कळायचं.' मृणालने मराठी सिनेमा 'विट्टी दांडू' मध्येही काम केलं आहे. याशिवाय ती साऊथ सिनेमांमध्येही लोकप्रिय आहे. नुकताच तिचा 'लस्ट स्टोरीज 2' सिनेमा रिलीज झाला. तसंच 'गुमराह' ही वेबसिरीजही गाजली. यंदा मृणालने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही पदार्पण केलं. टॅग्स :मृणाल ठाकूरबॉलिवूडटेलिव्हिजनMrunal ThakurbollywoodTelevision