Mumbai Drug Case: Aryan Khanच नाही तर गेल्या १० वर्षात या १२ Bollywood कलाकारांवर Sameer Wankhede यांनी उगारलाय कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 09:16 AM2021-10-27T09:16:57+5:302021-10-27T09:48:58+5:30

Sameer Wankhede News: समीर वानखेडे यांनी गेल्या १० वर्षांत विविध ठिकाणी कार्यरत असताना बॉलिवूडच्या कलाकारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मी बॉलिवूडच्याविरोधात नाही, मात्र जे कायदा मोडतात, त्यांच्याविरोधात आहे, असे ते सांगतात. आज आपण जाणून घेऊया समीर वानखेडेंनी कारवाईचा बडगा उगारलेल्या बॉलिवूडमधील १२ कलाकारांविषयी.

मुंबई ड्रग्स केस प्रकरणात आर्यन खानवर केलेल्या कारवाईनंतर एनसीबीचे विभागीय संचालक समाीर वानखेडे अडचणीत आले आहेत. मात्र समीर वानखेडे यांनी गेल्या १० वर्षांत विविध ठिकाणी कार्यरत असताना बॉलिवूडच्या कलाकारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मी बॉलिवूडच्याविरोधात नाही, मात्र जे कायदा मोडतात, त्यांच्याविरोधात आहे, असे ते सांगतात. आज आपण जाणून घेऊया समीर वानखेडेंनी कारवाईचा बडगा उगारलेल्या बॉलिवूडमधील १२ कलाकारांविषयी.

जुलै २०११ मध्ये शाहरूख खान आणि त्यांच्या कुटुंबाला कस्टम विभागाच्या पथकाने मुंबई विमानतळावर अडवले होते. त्यावेळी परवानगीपेक्षा अधिक सामान सोबत आणल्याने शाहरूख खानवर दीड लाख रुपयांच्या दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. या पथकाचे नेतृत्व समीर वानखेडे करत होते.

२०११ मध्ये अनुष्का शर्मा हिला समीर वानखेडे यांनी मुंबई विमानतळावर रोखले होते. तसेच तिची झडती घेण्यात आली होती. समीर वानखेडे यावेळीही कस्टम विभागाचा भाग होते. त्यावेळी अनुष्काकडे डायमंड ब्रेसलेट, नेकलेस ईअर रिंग्स आणि २ किमती घड्याळे होती. ११ तास विमानतळावर थांबवल्यानंतर अनुष्काला सोडण्यात आले होते.

कॅटरिना कैफ हिचेही नाव समीर वानखेडेंनी कारवाई केलेल्या कलाकारांच्या यादीमध्ये आहे. २०१२ मध्ये मुंबई विमानतळावर समीर वानखेडे यांनी फेमा कायद्यांतर्गत कॅटरिना कैफ हिला १२ हजार रुपये दंड ठोठावला होता.

मिनिषा लांबा हिला मुंबई विमानतळावर मे २०११ मध्ये रोखण्यात आले होते. तिला कस्टम विभागाचे असिस्टंट कमिश्नर समीर वानखेडे यांच्या टीमने पकडले होते. तिच्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये डायमंड ज्वेलरी आणि मौल्यवान दगड सापडले होते. त्यांची किंमत ५० लाख एवढी होती. १६ तास केलेल्या चौकशीनंतर तिला सोडण्यात आले होते.

२०१३ मध्ये रणबीर कपूर यालाही समीर वानखेडेंच्या कारवाईचा सामना करावा लागला होता. रणबीर ब्रिटीश एअरवेजच्या विमानाने मुंबईत आला होता. यादरम्यान तो केवळ विमानतळ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना परवानगी असलेल्या मार्गाने जात होता. त्यावेळी त्याच्या बॅगमध्ये एक लाखाहून अधिक किमतीचे सामान होते. सुमारे ४० मिनिटे चाललेल्या चौकशीनंतर त्याच्यावर ६० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

२०१३ मध्ये बँकॉकवरून परत येत असताना मिका सिंगच्या बॅगमध्ये ९ लाख रुपयांचे सामान होते. त्याची माहिती न देता तो विमानतळाबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्याला कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्सच्या यूनिटने पकडले. या युनिटचे नेतृत्व समीर वानखेडे करत होते.

बिपाशा बसूला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर समीर वानखेडे यांच्या टीमने रोखले होते. त्यावेळी तिच्याकडे ६० लाख रुपयांचे मौल्यवान सामान होते. मात्र तिने त्याबाबत कुठलेही डिक्लरेशन केले नव्हते. त्यामुळे तिला १२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

ऑगस्ट २०१३ मध्ये समीर वानखेडे हे सर्व्हिस टॅक्स विभागामध्ये उपायुक्त म्हणून काम करत होते तेव्हा त्यांनी अनुराग कश्यपवर टॅक्स इन्व्हेशनमुळे ५५ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. तसेच त्यांचे खातेही त्याच वर्षी गोठवण्यात आले होते. कारण ते विभागाला सहकार्य करत नव्हते.

अनुराग कश्यपवरील कारवाईनंतर महिनाभराने विवेक ओबेरॉयसुद्धा सर्व्हिस टॅक्स विभागाकडून सर्व्हिस टॅक्स इनोव्हेट केल्यामुळे पकडला गेला होता. त्यावेळीही उपायुक्त समीर वानखेडेच होते. विवेक ओबेरॉयवर ४० लाख रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप होता.

८ डिसेंबर २०२० रोजी रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये ड्रग्स अँगल सापडला होता. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या टीमने व्हॉट्स अॅप चॅटच्या आधारावर रियाला ताब्यात घेतले होते.

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर ड्रग्स प्रकरणामध्ये दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांना एनसीबीने समन्स बजावले होते. समीर वानखेडे यांनी या तिघींचीही चौकशी केली होती.

अभिनेता अरमान कोहली याला एनसीबीने ऑगस्ट २०२१ मध्ये ड्रग्स कन्झ्यूम केल्या प्रकरणी अटक केली होती. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडेच या प्रकरणी कारवाई करत होते. हे प्रकरण सध्याही चर्चेत आहे.

आर्यन खान केस सध्या गाजत आहे. शाहरूख खानचा मुलगा असलेल्या आर्यन खानला अद्याप जामीन मिळालेला नाही. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आर्यन खानला ड्रग्स क्रूझ पार्टी प्रकरणी २ ऑक्टोबर रोजी पकडले होते.

Read in English