मारहाणीचा आरोप अन् 'ब्रेकअप'! 'या' बॉलिवूड अभिनेत्याबरोबर होतं मुनमुन दत्ताचं अफेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 12:20 PM2024-03-14T12:20:08+5:302024-03-14T12:55:09+5:30

तारक मेहताची 'बबिता' बॉलिवूड अभिनेत्याच्या होती प्रेमात. नक्की काय बिनसलं?

'तारक मेहता काउल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील सगळेच कलाकार आज सेलिब्रिटी बनलेत. सगळ्यांचाच वेगळा चाहतावर्ग आहे. विशेष करुन जेठालालचं बबिताजींवर असलेलं छुपं प्रेम पाहून प्रेक्षक खळखळून हसलेत.

अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हिने बबिता ही भूमिका साकारली आहे. तिच्या सौंदर्यावर जेठालालच काय सगळेच फिदा आहेत. सध्या बबिता अका मुनमुन एका कारणामुळे चर्चेत आली. मालिकेतील टप्पूच्या भूमिकेत असलेला राज उनाडकटसोबत तिने साखरपुडा केल्याची अफवा पसरली. मात्र ती बातमी खोटी असल्याचं दोघांनीही स्पष्टीकरण दिलं.

दरम्यान मुनमुन दत्ता गेल्या १४ वर्षांपासून या मालिकेचा भाग आहे. तिने इचर कोणतेही प्रोजेक्ट्स फारसे केले नसले तरी मनोरंजनसृष्टीत ती चांगलीच लाईमलाईटमध्ये असते. आता बबिताजींचं नक्की कोणासोबत अफेअर होतं का असा प्रश्न चाहत्यांना पडला असेलच. तर याचं उत्तर आहे हो.

मुनमुन दत्ता आणि एका बॉलिवूड अभिनेत्याचं अफेअर होतं. तारक मेहता मालिका सुरु झाल्यानंतर त्याच वर्षी मुनमुन रिलेशनशिपमध्ये आली होती. तो अभिनेता कोण?

२००८ साली मुनमुन दत्ता आणि अभिनेता अरमान कोहली (Armaan Kohli) रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्यात एका बार व्हॅलेंटाईन डेला भांडण झालं. यावेळी अरमानने चक्क तिच्यावर हात उचलला होता. यावरुन मुनमुनने अरमान कोहलीविरोधात पोलिसात तक्रारही केली होती.

याविषयी अभिनेत्री डॉली बिंद्राने माध्यमांना माहिती दिली होती. ती म्हणाली, 'दोघंही व्हॅकेशनसाठी मॉरिशसला गेले होते. तिथेच त्यांच्यात मोठं भांडण झालं. यानंतर अरमानने तिच्यासोबत वाईट वर्तन केलं. यामुळे अरमानला दंडही भरावा लागला होता.

मुनमुन दत्ताने 2004 साली 'हम सब बाराती' मालिकेतून सुरुवात केली होती. यानतर २००८ पासून ती 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये काम करत आहे. या मालिकेने तिला स्टार केलं. याशिवाय तिने 'हॉलिडे','ढिनचॅक एंटरप्राईज' आणि 'मुंबई एक्सप्रेस' या सिनेमांमध्ये काम केलं आहे.