समांथापासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यला झाला मोठा पश्चाताप? अभिनेता म्हणाला, मला आयुष्यात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 01:16 PM2023-05-02T13:16:48+5:302023-05-02T13:30:00+5:30

समांथा तिला विचारलेल्या घटस्फोटबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देते, पण नागा चैतन्य मात्र बोलणं टाळतो. नुकतंच एका मुलाखतीत त्याने घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल भाष्य केलं आहे.

समांथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतल्यामुळे नागा चैतन्य अनेकदा चर्चेत असतो. दोघांच्या लग्नाला जवळपास चार वर्षे झाली होती आणि लग्नाच्या चौथ्या वाढदिवसापूर्वीच दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली होती.समांथा व नागा चैतन्य आता विभक्त झाले आहेत.

समांथा व नागा चैतन्य यांना बऱ्याचदा त्यांच्या घटस्फोटाबद्दल विचारलं जातं. समांथा त्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देते, पण नागा चैतन्य मात्र बोलणं टाळतो. नुकतंच एका मुलाखतीत त्याने घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची नागा चैतन्यने उत्तरं दिली. अभिनेत्याला विचारण्यात आले होते की, त्याच्या आयुष्यातील कोणत्या निर्णयाचा त्याला पश्चाताप झाला आहे?

यावर चैतन्यने उत्तर दिले की, मला आयुष्यात काही विशेष पश्चाताप नाही. या अभिनेत्याचे म्हणणे आहे की, त्याला आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप झालेला नाही. त्याने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा पश्चाताप नाही, कारण प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी धडा राहिली आहे.

समांथापासून विभक्त झालेल्यानंतर नागाचं नाव सातत्याने अभिनेत्री शोभिता धूलिपला सोबत जोडले जाते आहे.

समांथापासून विभक्त झालेल्यानंतर नागाचं नाव सातत्याने अभिनेत्री शोभिता धूलिपला सोबत जोडले जाते आहे.

आतापर्यंत नागा चैतन्य आणि शोभिता यांच्याकडून त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. दोघांनाही आपलं नातं खासगी ठेवायचं असल्याचं बोललं जात आहे.