IN PICS : शाहरूखच्या ‘मन्नत’लाही लाजवेल असा बंगला बांधणाऱ्या नवाजुद्दीनची संपत्ती किती माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 03:57 PM2022-01-28T15:57:39+5:302022-01-28T16:06:52+5:30

Nawazuddin Siddiqui's Mansion 'Nawab' Is No Less Than SRK's Mannat : नवाजुद्दीन सिद्दीकीला कोण ओळखत नाही? छोट्या शहरातून आलेल्या या सामान्य चेहऱ्याच्या छोकऱ्यानं आज बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मुंबईत त्याचा स्वप्नांचा महाल उभा आहे. सध्या त्याचीच चर्चा आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीला कोण ओळखत नाही? छोट्या शहरातून आलेल्या या सामान्य चेहऱ्याच्या छोकऱ्यानं आज बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मुंबईत त्याचा स्वप्नांचा महाल उभा आहे. सध्या त्याचीच चर्चा आहे.

नवाजने त्याच्या बंगल्याचं नुकतंच नुतनीकरण केलं. यासाठी 3 वर्ष लागलीत. वडिलांच्या समर्थनार्थ नवाजने आपल्या या बंगल्याला ‘नवाब’ असं नाव दिलं आहे. त्याच्या या पांढऱ्या शुभ्र लक्झरी मेन्शनमधील भव्य व्हरांडा, मोठा टेरेस सगळंच बघण्यासारखं आहे.

नवाजच्या या बंगल्याची तुलना आता थेट शाहरूख खानच्या ‘मन्नत’शी होतेय. इंडस्ट्रीत 22 वर्षात नवाजने प्रचंड स्ट्रगल केला. आज त्याच्याकडे असलेला हा अलिशान बंगला, त्याचं यश सगळं काही याचाच परिणाम आहे. आज त्याच्याकडे कोट्यावधीची संपत्ती आहे.

1999 साली नवाजुद्दीन ‘सरफरोश’ या सिनेमात एका छोट्याशा भूमिकेत दिसला होता. तेव्हा त्याच्याकडे कुणाचं फारसं लक्षही गेलं नव्हतं. गावात वॉचमन ते बॉलिवूडचा यशस्वी स्टार हा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे.

एका रिपोर्टनुसार, नवाजची एकूण संपत्ती 150 कोटींच्या घरात आहेत. दर महिन्याला तो सुमारे 1 कोटींची कमाई करतो.

नवाजकडे महागड्या गाड्या आहेत. यात मर्सिडीज बेंज, बीएमडब्ल्यू, ऑडी सारख्या अलिशान गाड्या आहेत.

नवाज एका सिनेमासाठी सुमारे 6 कोटी रूपये घेतो तर ब्रँडच्या प्रमोशनसाठी सुमारे 1 कोटींपर्यंत फी घेतो.

चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत आपला दबदबा निर्माण करणारा नवाजुद्दीन अलिशान आयुष्य जगतो. अर्थात आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत.

गावातील घरी वषार्तून एकदा तो नक्की जातो. शेतात कामही करतो. गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात नवाजुद्दीन गावातील छोट्याशा घरात अनेक महिने मुक्कामाला होता.