IN PICS : नवाज बदलला, तशी लाईफस्टाइलही बदलली! वर्षाला कमावतो इतके कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 09:18 AM2021-04-16T09:18:00+5:302021-04-16T09:26:10+5:30

Nawazuddin Siddiqui Net Worth 2021 : चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत आपला दबदबा निर्माण करणारा नवाजुद्दीन अलिशान आयुष्य जगतो. अर्थात आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत.

केवळ आणि केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला आज कोण ओळखत नाही. (Nawazuddin Siddiqui Net Worth 2021, Income, Cars, Assets, Lifestyle)

शूल आणि सरफरोश या सिनेमातून नवाजने (Nawazuddin Siddiqui) करिअरची सुरुवात केली. पण या सिनेमात त्याच्या वाट्याला आलेली भूमिका इतकी लहान होती की, लोकांनी त्याला नोटही केले नाही.

पण याच छोट्या छोट्या भूमिकांनी नवाजला मोठे बनवले. इतके मोठे की, आज बॉलिवूडच्या आघाडीच्या आणि बिझी कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते.

नवाजुद्दीन आज इंडस्ट्रीचे मोठे नाव आहे. 2021 साली त्याचे नेटवर्थ 13 मिलियन म्हणजेच 96 कोटी रूपये आहे.

caknowledge.com च्या रिपोर्टनुसार, नवाजुद्दीन प्रत्येक महिन्याला 1 कोटींपेक्षा अधिकची कमाई करतो.

या हिशोबाने वर्षभरात तो 12 ते 13 कोटींची कमाई करतो.

काही वर्षांपूर्वी नवाजने मुंबईतील वर्सोवा भागात एक घर खरेदी केले होते. आज त्या घराची किंमत 12.8 कोटी रूपये आहे.

नवाजला गाड्यांचीही आवड आहेत. त्याच्या ताफ्यात Mercedes Benz, BMW, Audi अशा अलिशान गाड्या आहेत.

चित्रपटांपासून वेबसीरिजपर्यंत आपला दबदबा निर्माण करणारा नवाजुद्दीन अलिशान आयुष्य जगतो. अर्थात आजही त्याचे पाय जमिनीवर आहेत.

गावातील घरी वर्षातून एकदा तो नक्की जातो़ शेतात कामही करतो. गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात नवाजुद्दीन गावातील छोट्याशा घरात अनेक महिने मुक्कामाला होता.