PHOTO: नवं वर्ष आणि एक नवी सुरुवात! अभिनेत्री दीपा परब पोहोचली अंबाबाई मातेच्या दर्शनाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 17:46 IST2025-01-02T17:36:19+5:302025-01-02T17:46:51+5:30

नववर्षाची सुरुवात भक्तिमय वातावरणात, अभिनेत्री दीपा परब अंबाबाईच्या चरणी नतमस्तक!

अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी दीपा परब ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

दीपाने तिच्या आजवरच्या फिल्मी कारकिर्दीत वेगवेगळ्या मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली.

अलिकडेच ती 'बाईपण भारी देवा' चित्रपटात झळकली. त्यामध्ये तिने केलेल्या कामाचं सगळीकडे कौतुक झालं.

शिवाय झी मराठी वाहिनीवरील 'तू चालं पुढं' या मालिकेतही तिने काम केलं. या माध्यमातून मालिकाविश्वात कमबॅक करत पुन्हा प्रेक्षकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरली.

दरम्यान, नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

काल नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दीपाने कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

नवं वर्ष आणि एक नवीन सुरुवात! असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.