ते दिवस मला पुन्हा जगायचे नाहीत..., बिनधास्त आयुष्य जगणारी निया शर्मा असं का म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 05:41 PM2021-09-09T17:41:47+5:302021-09-09T17:53:55+5:30

टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा (Nia Sharma) स्वत:च्या अटींवर जगणारी बिनधास्त नटी. अनेकदा बोल्ड फोटोंमुळे ट्रोल होणारी निया सतत चर्चेत असते.

टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री निया शर्मा स्वत:च्या अटींवर जगणारी बिनधास्त नटी. अनेकदा बोल्ड फोटोंमुळे ट्रोल होणारी निया सतत चर्चेत असते.

हीच निया अलीकडे तिच्या स्ट्रगलबद्दल बोलली. कलाकारांचं आयुष्य लोकांना फार अलिशान वाटतं. पण त्यामागचे कष्ट, त्यामागचा संघर्ष त्यांना माहित नसतो, असं निया म्हणाली.

ती म्हणाली, मी स्वबळावर इंडस्ट्रीत आले. नशीबाने साथ दिली आणि मला ‘एक हजारों में मेरी बहना है’ ही मालिका मिळाली. या मालिकेने मला नवी ओळख दिली. पण यानंतर तब्बल वर्षभर माझ्याकडे काम नव्हतं.

पुढे ती म्हणाली,‘एक हजारों में मेरी बहना है’ संपल्यानंतर नऊ महिने मला काम नव्हतं. मी मुबईत एकटी राहायचे. फार मित्रही नव्हते. आजच्या सारखा सोशल मीडियही नव्हता. ज्यातून काही पैसे कमवता येतील.

मुंबईत एकटी, नवीन असल्याने माझे फार काही मित्र नव्हते. त्यामुळे मी स्वत:वर काम केले; बेली डान्स शिकायला सुरूवात केली. पण त्या 9 महिन्यात मी एक रूपयाही कमावला नाही. आता त्या आठवणीही नको वाटतात. ते दिवस मला पुन्हा जगायचे नाहीत, असेही ती म्हणाली.

सध्या माझ्याकडे फार काही खास प्रोजेक्ट नाही. पण म्युझिक व्हिडीओ, ब्रँड प्रमोशन व अन्य काही प्रोजेक्ट मी करतेय, अशी माहितीही तिने दिली. सध्य नियाचे ‘दो घूंट’ हे गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

निया कायम तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर निया कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत.

2017 मध्ये सेक्सिएस्ट एशियन वूमनच्या यादीत निया तिस-या स्थानावर होती. पण 2018 मध्ये मात्र तिने तिस-या स्थानावरून दुस-या स्थानावर उडी घेतली होती.लंडन येथील ‘इस्टर्न आय’ या मॅगझिनने ही 50 ‘मोस्ट सेक्सिएस्ट एशियन वूमन’ची यादी जाहीर केली होती.

Read in English