अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत अशा कलाकारांची फौज; मराठीतला 'हा' मल्टिस्टारर कॉमेडी सिनेमा पाहिलाय?
By देवेंद्र जाधव | Updated: February 10, 2025 18:23 IST2025-02-10T17:20:30+5:302025-02-10T18:23:25+5:30
हा मराठी सिनेमा पाहून तुमचं हसून हसून पोट दुखेल. कोणता आहे हा सिनेमा? क्लिक करुन आताच जाणून घ्या (ashok saraf)

अशोक सराफ हे मराठीतील लोकप्रिय अभिनेते. अशोक सराफ यांच्या अशाच एका सिनेमाबद्दल आम्ही सांगणार आहोत. हा सिनेमा पाहून तुमचं हसून हसून पोट दुखेल
या सिनेमाचं नाव 'निशाणी डावा अंगठा'. या सिनेमात अशोक सराफ यांच्यासोबत मकरंद अनासपुरे, मोहन आगाशे, विनय आपटे, निर्मिती सावंत अशा कलाकारांची फौज होती
रमेश इंगळे-उत्रादकर यांनी लिहिलेल्या 'निशाणी डावा अंगठा' या कादंबरीवर आधारीत हा सिनेमा होता. निखळ करमणूक करणारा सिनेमा म्हणून हा ओळखला जातो.
'निशाणी डावा अंगठा' सिनेमात सावरगाव नावाच्या गावात साक्षरता अभियान राबवण्याची नोटिस येते. ही नोटिस आल्यावर शाळेतले मुख्याध्यापक आणि शिक्षक मिळून ही योजना वेगळ्या पद्धतीने राबवून सरकारी अधिकाऱ्यांची कशी फसवणूक करतात याची कहाणी दिसते
अशोक सराफ यांनी सिनेमात सावरगाव शाळेतील मुख्याध्यापकांची भूमिका साकारली आहे. अशोक सराफ यांच्या करिअरमधील ही एक वेगळी भूमिका ठरली
याशिवाय 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे यांनी सिनेमा झुंबड मास्तराची साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. 'निशाणी डावा अंगठा' सिनेमा आपली हसवणूक आणि करमणूक करतो
मराठी सिनेसृष्टीमधील हा एक मल्टिस्टारर सिनेमा असून तो तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळेल. टेन्शन विसरुन खळखळून हसायचं असेल तर नक्की हा सिनेमा बघा