नायक नहीं, खलनायक हूं में..! मराठी टेलिव्हिजनवरील खलनायिका एका एपिसोडसाठी घेतात तब्बल इतकं मानधन By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 07:00 AM 2022-04-14T07:00:00+5:30 2022-04-14T07:00:01+5:30
Marathi Serial: वेगवेगळ्या मालिकांमध्ये वेगवेगळ्या खलनायक आहेत. मात्र यामध्ये आई कुठे काय करते मालिकेतील संजना ही जास्तच भाव खाऊन जाते. संजना ही एका भागासाठी खूप पैसे घेते. इतर खलनायिका किती मानधन घेतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. संजना (अभिनेत्री रुपाली भोसले Rupali Bhosle) - आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमध्ये सर्वाधिक लोकप्रिय पात्र म्हणून संजनाकडे पाहिले जाते. संजनाची भूमिका रुपाली भोसले हिने साकारली आहे. तिची भूमिका नकारात्मक असली तरी प्रेक्षकांना ती खूप भावते. संजना ही एका भागासाठी तब्बल ४२ हजार रुपये मानधन घेते.
शालिनी (अभिनेत्री माधवी निमकर Madhavi Nimkar) - सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asata) या मालिकेमध्ये शालिनी ही भूमिका अतिशय लोकप्रिय झाली. ही भूमिका अभिनेत्री माधवी निमकर हिने साकारली आहे. तिने खलनायिकाचे पात्र अतिशय उत्तम साकारले आहे. माधवी निमकर मालिकेतील एका भागासाठी तब्बल ३९ हजार रुपये मानधन घेते.
श्वेता (अभिनेत्री अनघा अतुल भगरे Anagha Atul Bhagre) - रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) या मालिकेमध्ये श्वेता हिने देखील जबरदस्त खलनायिकेची भूमिका साकारली आहे. श्वेताची भूमिका अभिनेत्री अनघा अतुल भगरे हिने साकारली आहे. ती ही एका भागासाठी २५ हजार रुपये मानधन घेते.
सिमी (अभिनेत्री शीतल क्षीरसागर Sheetal Kshirsagar)- माझी तुझी रेशीमगाठ (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेमध्ये सिमी ही भूमिका देखील लोकप्रिय ठरली आहे. तिने आपले नकारात्मक पात्र अतिशय चांगले साकारले आहे. एका भागासाठी ती १८ हजार रुपये मानधन घेते.
आयशा (अभिनेत्री विदिशा म्हस्कर Vidisha Mhaskar) - रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla) या मालिकेमध्ये आयशाने नकारात्मक भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. ती एका भागासाठी २१ हजार रुपये मानधन घेते.
वल्ली (अभिनेत्री अभिज्ञा भावे Abhidnya Bhave) - तू तेव्हा तशी (Tu Tevha Tashi) ही मालिका नुकतीच सुरू झाली आहे. यातील स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकरची भूमिका लोकप्रिय ठरताना दिसत आहे. या मालिकेत वल्ली हिने देखील खलनायिकेची भूमिका छान साकारली आहे. वल्लीची भूमिका अभिनेत्री अभिज्ञा भावेने साकारली आहे. ती एका भागासाठी २८ हजार रुपये मानधन घेते.
सानिका (अभिनेत्री रीना अगरवाल Reena Agarwal) - 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Jhala) या मालिकेमध्ये सानिका हिने देखील नकारात्मक भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. सानिकाची भूमिका रिना अगरवाल हिने साकारली आहे. ती देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती एका भागासाठी ११ हजार रुपये मानधन आकारते.
आशा (अभिनेत्री किशोरी आंबिये Kishori Ambiye) सहकुटुंब सहपरिवार या मालिकेमध्ये आशाची भूमिका देखील नकारात्मक असली तरी अतिशय लोकप्रिय अशी आहे. ही भूमिका अभिनेत्री किशोरी आंबियेने निभावली आहे. एका भागासाठी किशोरी आंबिये १९ हजार रुपये मानधन घेतात.