आमिरच नाही तर 'हे' सेलिब्रिटी म्हातारपणी पडले प्रेमात, एकाने तर ७० व्या वर्षी केलं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:00 IST2025-03-20T12:46:08+5:302025-03-20T13:00:45+5:30
प्रेमाला वयाचं बंधन नसतं! कोणी पन्नाशी, कोणी साठी तर कोणी अगदी सत्तरीतही बांधली लग्नगाठ

बीटाऊनमध्ये सध्या आमिर खानची (Aamir Khan) चर्चा आहे. अभिनेता वयाच्या ६० व्या वर्षी प्रेमात पडला आहे. दोन घटस्फोटांनंतर आता आमिर ४६ वर्षीय गौरी स्प्रॅटला डेट करत आहे.
पण या वयात प्रेमात पडणारा आमिर एकटाच नाहीए. तर याआधी बरेच सेलिब्रिटी म्हातारपणात प्रेमात पडले आहेत. एकाने तर वयाच्या ७० व्या वर्षीही लग्नगाठ बांधली आहे.
साऊथ तसंच हिंदी सिनेमांमध्ये व्हिलनच्या भूमिकेत लोकप्रिय असलेले अभिनेते आशिष विद्यार्थी यांचाही घटस्फोट चर्चेत होता. तसंच घटस्फोटानंतर काहीच महिन्यात वयाच्या ६० व्या वर्षी त्यांनी त्यांनी दुसरं लग्न केलं. २०२३ मध्ये त्यांनी रुपाली बरुआशी लग्नगाठ बांधली.
या यादीत मराठमोळा अभिनेता मिलिंद सोमणही येतो. मिलिंदने ५२ व्या वर्षी स्वत:हून २६ वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोनवारसोबत लग्नगाठ बांधली. मिलिंद आणि अंकिताच्या वयातील अंतराने त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं होतं.
अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी तर सर्वांनाच माहित आहे. अविवाहित असताना त्यांनी लेक मसाबाला जन्म दिला होता. बरीच वर्ष त्या सिंगल मदर होत्या. वयाच्या ५४ व्या वर्षी त्या चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या विवेक मेहराच्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी लग्न केलं.
हिंदी सिनेमातले व्हिलन कबीर बेदी यांचं वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत राहिलं. त्यांचे आतापर्यंत बरेच अफेअर्स झाले. कबीर बेदींनी आपल्या ७० व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी चौथं लग्न केलं. त्यांच्या चौथ्या पत्नीचं नाव परवीन दोसांझ आहे. विशेष म्हणजे कबीर बेदी यांची मुलगी पूजा बेदीहून परवीन लहान आहे.
दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही वयाच्या ५४ व्या वर्षी लग्न केलं. सैफीना हुसैन ही त्यांची पत्नी आहे. दोघांनी १७ वर्ष एकमेकांना डेट केलं आणि नंतर लग्न केलं.
'लगान' सिनेमात आमिर खानच्या आईच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्री सुहासिनी मुळे या आयुष्यात सुरुवातीची बरीच वर्ष अविवाहित राहिल्या. एका ब्रेकअपमधील धक्क्याने त्यांनी कधीच लग्न केलं नव्हतं. वयाच्या ६० व्या वर्षी त्यांना खरं प्रेम मिळालं. फेसबुकवर ओळख झालेल्या अतुल गुर्तू यांच्याशी त्यांनी लग्न केलं.